चारोळ्या - प्रेम

ही कविता नाही झाली पूर्ण

शब्दांना नाही गाठली धुंद,

नशा ही गरजेची आहे तुझ्या डोळ्यातली

त्यातचं लपते शब्दरचना होऊन मग्न…

चारोळ्या - प्रेम

लिखाणात शब्दांची अशी काही गोती झाली

निघताना त्यांची धांदल उडाली

बस एक श्वास हृदयात प्रेमाचा

त्याने नक्कीच नवी वाट दाखवली असती…

चारोळ्या - प्रेम

तू फक्त हो म्हण तुला साहित्यात सजवेन

त्यातल्या कलाकृतीतून नवा रंग देईन,

तुझ्या देखण्या रुपाला काही अलंकार वापरेन

तुला घडवेन आणि तुलाच बघत राहील…

चारोळ्या - प्रेम

तुझं हसणं खूप महत्वाचं आहे

त्यावर माझं हसणं अवलंबून आहे.

थोडसं पण उदास मन चालत नाही

हसत खेळत राहणंच आपल्याला

माहित आहे…

चारोळ्या - प्रेम

तू तुझ्यात नको गुंतू मला पहा

तू दूर नको जाऊ जवळ राहा,

जास्त काही नाही मनात माझ्या

तू आहेस जशी तशीच राहा…

Related Posts