तुझी माझी गाणी
जीवनाची हि तरानी,
रोमांच झालीए ही जिंदगी
आपली वेगळीच कहाणी…
ही मेहफिल रंगात यावी
काही क्षणांचा मिळेल अवधी,
थोडा धीर धरू एवढीच आशा
नंतर असू फक्त तू आणि मी…
हे बोलावणं फक्त निवेदन नाही
हा भाग आहे आयुष्याचा बराच काही,
तुलाही सामील करायचंय मला
याचा तुला अंदाज आला असेल ही…
शब्दांच्या नौका तुझ्या मनी असतील
माझे बोल तुझ्या कानी पडतील,
शब्द आणि भावना तुझ्याच आहेत
फक्त येताना ते माझ्या ओठातून येतील….
हि चर्चा हा विषय विसरून जा
माझे शब्द माझा हक्क विसरून जा,
काहीच नको ठेवू जवळ तुझ्या
फक्त माझं नाव मनात ठेवून जा….