चारोळ्या - प्रेम

एक हास्य दे पटकन

केव्हापासून वाट पाहतोय त्याची

शब्द आलेत ना ओठांवर तुझ्या

बोलून टाक ना लवकर माझ्यासाठी

चारोळ्या - प्रेम

आहे ना तू म्हणून लिहायला मजा येते

तुझ्याकडे तुलाच शोधायला मजा आहे

किती गोड गुपित आहे तुझं व्यक्तिमत्त्व

त्याला निरखून तुलाच दाखवायला मजा येते

चारोळ्या - प्रेम

तू एक अनोखी गोष्ट

जिला वाचण्यात आपलीच मजा आहे

तुझी ती बेधुंद नशा

जिच्यात राहण्याचा वेगळा अनुभव आहे

चारोळ्या - प्रेम

मस्ती नुसती व्हायला हवी

गप्पा मस्त रंगायला हव्या

या बोलण्याच्या मेहफिलीत

डोळ्यांनी भाग घ्यायला हवा

चारोळ्या - प्रेम

ही वेळ अनोखी आहे

जरा जास्तच आतुर आहे

काही कळत नाही यार

मदतीची तुझ्या गरज आहे

Related Posts