ह्या निसर्गाची गाणी
त्यातली धून तू दिवाणी
गाणं तर फक्त असण्यानेच येत
शब्द मुके डोळ्यात कहाणी
हवेच्या वाहत्या वेगात
फुलाच्या पसरत्या सुगंधात
आणि निसर्गाच्या त्या अद्भुत वातावरणात
एक अस्तित्व जाणवतं मनाला
तुझ्या त्या प्रत्येक गोष्टीत असण्यात
हसण्याच्या शर्यतीत वाट समोरची हरली
नवं नवं काहीतरी करून पाऊले पुढे चालली
ही मिळवण्याची आस ही गमावण्याची भीती
ह्या सोबतीच्या अखंड समुद्रात विरुनच गेली
पाकळीत गुंफून राहणं
बोलता बोलता मध्येच हसणं,
समजून ती गंमत खेळाची
शब्दांच्या कोड्यात अडकणं…
खुश होते ना तू मग लिहावंस वाटतं
ऐकतेस मग्न होऊन मग बोलावंसं वाटतं,
तिथे दुसरं काही नको असतं
तुझ्याच जवळ राहावंसं वाटतं…