तू तू असं सारखं असावं
मी कुठेच नसावं,
आपण हा शब्द आपल्यासाठी येतो
तिथे कोणत्या कारणांच विभाजन नसावं…
सांज संध्याकाळ बहरून यावी
या ओल्या नभाने हाक मारावी,
धुंद गार वायाची झुळूक जशी तशी
तुझ्या मिठीची चाहूल यावी…
ही वाट साधी आहे तिला पाकळ्यांनी सजवू
ही लाट वाहती आहे हिला संथ प्रवाह देऊ,
ह्या राहत्या किनाम्याला एक नवी साथ देऊ
ह्या निसर्गाच्या सानिध्यात आपल्या
प्रेमाची शाश्वती देऊ….
हवी ती ओळ हव्या त्या ठिकाणी लिहेन
तुझ्या वर्णनाची दिशा अशी काही बदलेन,
ना जमलंय आजवर कुणाला ना जमेल कधी
असं काही तुझं रूप मी शब्दात मांडेन…
तू असणार ही खात्री आहे
तू आहेस हे माहीत आहे,
तू राहशील हा माझा विश्वास आहे
तू आणि मी एवढाच ध्यास आहे…