चारोळ्या - प्रेम

तुझ्या हास्याच्या लाटेला अनेक किनारे आहेत

तुझ्या पाहण्याच्या स्पर्शाला अस्सल स्पर्श आहे,

तुझ्या बोलण्याच्या भावनेत अनेक शब्द आहेत
तुझ्यातल्या तुला दाखवायला

अनेक कविता आहेत….

चारोळ्या - प्रेम

तुझ्या हसण्यात मी मोह घालवून बसेन

तुझ्या पाहण्यात मी धुंद होऊन बसेन,

तुझा एक प्रतिसाद इतका मादक असेल

तुझ्या असण्याने मी आयुष्य खुलवून बसेन…

चारोळ्या - प्रेम

तू मान्य कर आता
आपलं प्रेम कमाल आहे,

त्यात असून मला एवढं तर जाणवतं

की साऱ्या छान गोष्टी त्यात आहेत….

चारोळ्या - प्रेम

एक शब्द राहिला होता बोलायचा तुला

तो बोलेन जेव्हा फुरसत असेल तुला,

अशा प्रकारे सांगेन की आवडेल तुला

त्या शब्दांपायी एक छानशी

मिठी देशील मला…

चारोळ्या - प्रेम

रुबाब ना तुझ्याकडून शिकावा

मैत्रीचा सहवास तुझ्याकडून घ्यावा,

प्रेमातला गोडवा, त्याची पद्धत

मला ही कायम तुझाच साथ मिळावा…

Related Posts