एक कविता पुरेशी नाही होत
एक कथा पुरेशी नाही होत,
आता कादंबरी ही अपुरी ठरली तुझ्यासाठी
साहित्य पाहतो ना! तर तेही पुरेसं नाही होत…
तुझं हास्य ना मला खूप आवडतं
त्याने प्रेमात पाडलं मला,
मी म्हणालो होतो ना कधी
प्रेमात नाही पडणार
त्या हास्याने सहज हरवलं मला…
या उदासलेल्या दुपारी
तुझ्या येण्याची चाहूल देना
या भरकटलेल्या विचारांना
वाट मोकळी करून देना,
हीच तर वेळ ती
जिची मी वाट पाहत असतो
तुला जेव्हा जेव्हा आठवतो
मी पेन आणि डायरी घेऊन बसतो…
अशी तशी मस्ती आहे का
आपल्याशी वेगळी यारी आहे ना,
हवं तेव्हा हास्य आणू शकू
अशी आपल्या प्रेमाची स्टाईल आहे ना…
ही साद वायाची छेडत जाऊ
गीत नवे नवे गात जाऊ,
या स्वप्नाच्या दुनियेत खूप सारी मजा आहे
तू आणि मी आपण सोबतच राहू…