चाहूल नको ना देऊ
समोर येऊन थांब ना,

नुसते मेसेज वर नको बोलू

भेटायला तरी बोलावं ना!

गोड गुलाबी हसण्यात तुझ्या

जगातलं सारं सुख सहज मिळेल

तुझ्या पाहण्यातल्या नजरेला पाहून

हरवलेलं मन नक्कीच पुन्हा मिळेल…

रुसवा नको रे आता

हवतर ओरड हसता हसता,

चार पांचवेळा मिठी मार हरकत नाही

नंतर काहीतरी बोल जाता जाता…

धीम्या धीम्या दुपारी

एक लहर तर येऊदे जरा,

या सतत पाहणाच्या डोळ्यांना

तू एक हास्य देऊन हसव जरा…

सांग थोडी मदत कर

हाथ दे जरा मला वर कर,

ऐकव जरा मनातलं पण

म्हणजे तू पण बोलशील

अजून कविता कर…

Related Posts