हे प्रेमातलं पाहणं तुझं
डोळ्यात माझ्या प्रेम भरत चाललं आहे,
तुझं कितीही वर्णन केलं मी तरी
मन मात्र अजून लिहित चाललं आहे….
धावत्या ट्रेनच्या पळत्या प्रवासात
एक छानशी विश्रांती तू
रस्त्यावर चालत्या धावपळीत एक संथ
पाऊल वाट म्हणजे तू,
या मोहात पडलेल्या प्रत्येक श्वासाची
अडचण दूर करणारी सवड तू
या अस्थिर मनाला आधार देऊन
स्थिर करणारी गोष्ट तू…
तू इतकी नको काळजी करुस
इतके काही वाटू देणार नाही,
तू खुश राहशील नेहमी
असाच क्षणाक्षणाला प्रयत्न राहील…
गफलत झाली वाटतं
तू साद दिली ना मनापासून
म्हणून सर्व हवं ते आलं जवळ तुझ्यासाठी,
तुला हसरं बघायचं होतं ना मग
सगळ्या गोष्टींची धांदल उडाली…
पाकळीच्या कुशीत आसरा ठेव
तिथे सुवास पसरलेला असेल,
तुझ्या मनात एक जागा ठेव
मी तिथे बाहेरच थांबलेलो असेल….