तुला पाहताना मी स्थिरावली

जरा थांबलो, जरा सावरलो,

तुझा सुगंध भिनला शरीरात

तुला पाहतच राहिलो, तुला पाहतच राहिलो…

तूच तू अशी काही

नाव गुंतलं सहज अगदी,

प्रेम व्यक्त नाही होत आहे

कारण ते जुळलं गेलय तुझ्यासाठीच…

तुझी एक पाऊलवाट

फिरली माझ्या हृदयापाशी,

तुझच नाव फिरत राहिलं

माझ्या सर्वांगी सर्वस्वी…

ही वाट मनानी रोखली

ही गाठ हृदयाने बांधली,

जरा नजर वर केली माझी

ही साथ प्रेमाने भेट दिली…

हे असेच होते आधी

हे असेच राहावे आताही,

तुज दिसेनासं होते माझं मन

ते रंगतय तुझ्यातच आताही…

Related Posts