सोबत त्या रोमांचक राईड मधली!

“उदय उठ रे, किती झोपणार आहेस आपल्याला बाहेर जायचं आहे सोबत. चल लवकर तयार हो उशीर होईल आपल्याला परत.” आलो ग, उठतो थांब! तू ये तोवर मी आवरतो पटकन.” “आळशी, नेहमी येतोस ना लवकर आज काय झालंय? इंटरेस्ट कमी झालाय वाटतं माझ्यातला तुझा!” “ओए, काहीही नको बोलूस, म्हटलं ना येतो यार. असं बोलून सगळी झोप उडवून टाकतेस माझी तू.” “हा ना! उडाली ना झोप, मग ये चल पटपट.”
“वोह! आज ह्या ड्रेसींग मध्ये सही दिसतेय ग! क्लासिक एकदम.” “बस काय, आहेच मी क्लासिक.” “खायला प्यायला घेतलं ना.” “हो खायला प्यायला दोन्ही घेतलंय.” तुझ्यासाठी कॉफी आणि माझ्यासाठी व्हाईट रम.” “उदय खरंच तू कॉफी पिणार, सिरियसली!” “हो, तू आहेस ना सोबत अजून एक अडिक्शन नको मला.” “हो… मग चला निघूया नाहीतर इथेच राहायला लागेल.” “बोला गणपती बाप्पा…” “मोरया” “लेट्स एन्जॉय दिस राईड टाईम.”
“मी व्हिडीओ रेकॉर्ड करतोय हा! जरा इकडे बघ” “उदय गाडी चालवतेय मी.” “हो ग, मला माहित आहे, थोडा वेळ साठी बघ ना इथे.” “हॅलो, हा उदय वेडा झालेला आहे.” “हो मी वेडा झालो आहे, आणि ही बघा माझी लव्ह. आम्ही चालोय आता मस्त घाटामधल्या या थंडीतल्या धुक्यातून.” “बस झालं ते जास्त जमत नाही मला असलं काही.” “हे सगळं मग आपल्यासाठी केलं का!” “मग काय! इतक्या दिवसांनी चाललोय आपण, हवं ना असं काहीतरी.”

“यार काय भारी सिनरी आहे बघ” “थांब जरा गाडी साईडला लावू दे मग बॅक सीटला बसून बघू” “आहा! याला म्हणतात सुकून…” “हो ना घे चल तुझी कॉफी, मी ओपन करतेय रम ची बॉटल! खूप थंडी आहे इथे” “तू थरमास आणलाय ना भरून गरम पाण्याचा, घे चल बनवू आपलं ड्रिंक” “असलं कॉकटेल पहिल्यांदाच होतंय ना अपल्या ट्रीप मध्ये” “वेगळेपण हवं ना, मग लेट्स डू इट”
“चिअर्स उदय” “चिअर्स माय लव्ह” “किती सुंदर ना, पाच मिनिटांपूर्वी धुकं होतं, आता सूर्यकिणांनी सगळं रंगून टाकलंय. त्यात या उंचीवरून ह्या डोंगरांची रांग. वरचे सगळे ढग आलेत या डोंगरांना पांघरून घालायला.” “हो खरंच मस्त आहे ही वेळ” “आपल्यासाठी आपली सोबत नेहमीच वेळ छान करते.”
- History of fashion part-4
- History of fashion part-3
- History of fashion part-2
- Brief History of fashion part-1
- Elements and principles of fashion design