दिवाळी – सण आणि धुमाकूळ…

दिवाळी आपला सण आहे, साजरा तर केलाच पाहिजे!

दिवाळी - सण आणि धुमाकूळ...

कोण म्हणतं दिवाळी ला मजा येत नाही. खरं सांगायचं तर सध्याला थोडी उलथापालथ आहे परिस्थितीची, पण कोणतीही वेळ कधीच कायम राहत नाही. ह्या उदासी ला थोडंसं दूर करत आपल्या सणाकडे वळूया. सगळेच उत्सुक असतात म्हणा. ज्याच्या त्याच्या परीने ज्याची त्याची सणाची तयारी असते. नवीन कपडे, घरात बनवला जाणारा फराळ, दिवे लावण्याची परंपरा आणि फटाके. ह्यातलं सगळंच असतं ह्या दिवाळीच्या दिवसांमध्ये.

पण ह्या सगळ्यात जे महत्वाचं मिळतं ते प्रेम, आनंद, उत्साह, मायेची झालर. कुटुंबातली ओळख कितीही जुनी असली, तरी तिला नवी ओळख हे नवे क्षण देऊन जातात. सोबतीतला घालवला जाणारा वेळ हा फार वेगळा असतो असं नाही म्हणा! परंतु त्या वेळेत मात्र वेगळेपण असतंच. ज्याचा आनंद सर्वजण उपभोगत असतात. मग घरातील साफसफाई पासून घरात सामान आणण्यापर्यंत ची सारी काम डोक्यात येतात. काय राहिलंय, काय आणलंय सगळ्याची यादी तयार होते.

हा सण सगळेच जण साजरा करतात. याला जातीपातीचं बंधन किंवा सीमा नाहीत. आजकालच्या युगात तर परदेशी सुद्धा ह्या सणाची जल्लोषात तयारी असते. पारंपरिक पोषकापासून स्त्रीच्या शृंगारापर्यंत सर्व काही पाहण्यासारखं असतं. सजून-धजून मिरवण्यात वेगळीच मजा असते. काहींची दिवाळी मित्रांकडे तर काहींची आपल्या सासुरवाडीत. म्हणजे दोन्ही कडूनच समजा. फक्त मुली लग्न करतात म्हणून त्यांची सासुरवाडी नव्हे तर जावई म्हणून जाताना सुद्धा मुलांची सासुरवाडी असतेच.

फटाके राहिले ना! ते कसे विसरेन मी. मी काय आपल्यापैकी कोणीच नाही विसरू शकत. मग ते लहानपण असो किंवा वयात येताना. प्रत्येकाकडे एक ना एक असा अतरंगी अनुभव असणारच. ह्यात मात्र काहीच शंका नाही. सण वार कोणताही आला तरी आपली माणसं आपल्या जवळ असणं खूप गरजेचं आहे. आयुष्याच्या तीव्र उन्हात तीच माणसं सावली बनून आपली काळजी घ्यायला कमी नाही करत. आपल्या सगळ्यांना दिवाळी छान च जाईल अशीच अपेक्षा आणि भरमसाठ शुभेच्छा सुद्धा.

@UgtWorld

Related Posts