सुखद क्षण शांत कुशीत निजताना…

एक क्षण पुरेसा असतो असं म्हणतात. सारं काही घडवून आणायला. कधी-कधी असे क्षण कळत-नकळत जगून घेतो. मी ही असाच काहीसा एक क्षण जगले. सोबतीच्या कुशीत मी बेफिकीर होऊन निजून राहिले. या पळत्या वाटेच्या मागे धावून एका सुखद आडोशाला जाऊन थांबले. भर उन्हात तहान भागावी तसा तो आडोसा मला मिळाला.

दगदगीतल्या आपल्या जीवनाच्या चित्रपटात एक मध्यांतर असतोच. तो असलाच पाहिजे म्हणा! प्रत्येकाला त्याची गरज असतेच. एक अशी व्यक्ती आपल्या जवळची जिथे मोकळेपण असतं आणि काळजी देखील. पण सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर ते असतं मानसिक समाधान. जे सध्याला तरी हरवलेलं आहे.

गप्पा ज्यांना शांतपणेचा थारा नसतो. शब्द ज्यांना बंधन नसतं. विचार जे क्षणोक्षणी काहीतरी बदलून आणण्याच्या मार्गावर असतात. पण या सगळ्यांमध्ये एक कूस रिकामी असते जी आपली आणि आपल्याचसाठी राखीव असते. मी माझे सारे क्षण घेऊन याच कुशीत शांत निजले. खरं सांगायचं तर एक वेगळंच समाधान आणि एक वेगळंच सुख मनात घर करून गेलंय.

माझा हा आडोसा माझ्यासाठी तरी खूप खास आहे. यात आठवणींचं गाठोडं पक्क भरलेलं आहे. ज्यात शब्दांना मायेची झालर आहे. त्याचसोबत प्रत्येक क्षणात आपुलकी आहे. मनात आस तर आहेच, पण ती ही वेळ न संपावी याच गोष्टीसाठी आहे. माझ्या व्यक्त होण्याला भावनिक आहे कारण माझ्यासाठी हा आडोसा त्या सर्व तप्त गोष्टींमध्ये मिळणाऱ्या थंड सावलीपेक्षा काही कमी नाही.

@UgtWorld




Write with us✍?

Greetings for Everyone from TeamUgtWorld! Anybody who wants to write whatever his/her Heart wants to. They can now publish their content with us at our platform @Ugtworld. For more information click on the following link??

Related Posts