कॉफी शॉप आणि तिकडची अतरंगी वेळ!
बहुतेक वेळेला भेटीगाठी आपण अश्याच कोणत्या तरी ठिकाणी करतो जसं की कॉफी शॉप जिथे आपल्याला अवघडल्यागत वाटणार नाही. अर्थात! समोरच्याला सुद्धा. कारण त्या भेटीचं एक वेगळं स्थान असतं किंवा एक वेगळं महत्व असतं आपल्या आयुष्यात. अशीच एक भेट मजेदार आणि मस्तीने भरलेली आठवली मला. जेव्हा आपली जवळची मैत्रीण आपल्या बरोबर असताना आपण कोणत्या तरी दुसऱ्या मुलीकडे चुकून पाहिलं तर दोन गोष्टी होतात, मला वेगळं सांगायला नको काय काय होतं ते पण माझ्याबरोबर तिने काय केलं हे मी सांगतो आता.
आम्ही त्या कॉफी शॉप मध्ये गेलो आणि एका जागेवर जाऊन बसलो. सेल्फ सर्व्हिस असल्यामुळे आम्हालाच ऑर्डर द्यायची होती हे लक्षात नाही आलं पटकन. शालिनी ला म्हटलं “जा ना, दोघांची ऑर्डर देऊन ये. हवतर आणायला मी जातो तिथे खूप मुली आहेत ग! परत हे ऍड करू का? ते ऍड करू का? म्हणाल्या कि मी लगेच हो म्हणेन ग त्यापेक्षा तूच जा पैसे वाचतील थोडेफार आपले” “उदय! मला माहित आहे तू खूप आळशी आहे ऑर्डर देण्याबाबतीत. हे बहाणे पण माहित आहेत आणि हे खरं आहे हे पण माहित आहे. पण शहाण्या तुला नाही बोलता येत ना! बोलायचं मग. तिला हा म्हणायला ती काय गर्लफ्रेंड नाही तुझी, जा तूच आज मला कंटाळा आलाय!”
शेवटी मला जावच लागलं, मैत्रिणी ऐकल्या म्हणजे झालं, कधी कधी ऐकतात म्हणा! पण नेहमी नक्कीच नाही. मी गेलो त्या काउंटर जवळ, त्यावेळी माझ्या पुढे दोन जण उभे होते. माझ्या बाजूच्या काउंटर ला पण दोघे होते तिथे ऑर्डर घेणारी मुलगी होती तिच्याकडे नुकतीच नजर गेली कारण ती खुणावत होती बाजूच्या तिच्या मैत्रिणीला. मी ते पाहून हळूच हसलो आणि ती ही मला पाहून हसली कारण जो काही जोक झाला तो सांगण्यापलीकडे आहे इथे तरी. तिने सांगितलं या लाईन मध्ये या त्यांची ऑर्डर झाली आहे. जे दोघे होते ते सोबतच होते आणि ते गेले. मग मी त्या काउंटर ला जाऊन उभा राहिलो आणि हसत हसत च ऑर्डर देत होतो ती सुद्धा हसतच होती. तो जोक आम्हाला माहित होता पण शालिनी ला नाही.
शालिनी जागेवरून उठून आली विचारायला,”उदय! दिलीस का ऑर्डर? अजून किती वेळ गप्पा मारत बसणार आहे काम करुदे तिला आता.” “मला खरच खूप हसायला आलेलं आणि मी हसणार पण शालिनी वैतागलेली मग जीभ चावली आणि म्हंटलं हो हो झाली बिल पे करत होतो थांब थोडं.” तिने माझं कार्ड घेतलं म्हणाली “दे इकडे मी करते मला माहित आहे तुझ्या कार्डचं पिन. जा बस आता जाऊन माझी बॅग तिथेच आहे मी आले.” ती काउंटर वरची मुलगी आणि मी आम्ही दोघे एकमेकांकडे बघून हसत होतो. मी आलो जागेवर माझ्या मागून ती ही आली बिल पे करून.
“काय करत होता रे एकटच यायचं ना मग तिच्याशी गप्पा मारायच्या होत्या तर. तुला माहित आहे ना एकतर आपण लवकर भेटत नाही, त्यात तू असं करणार मग माझं डोकं फिरतं. मी गर्लफ्रेंड नसली म्हणून काय झालं तुझी खूप चांगली मैत्रीण आहे. मारेन पण आणि शिव्या पण देईन डोकं फिरवलं तर तेवढा हक्क आहे मला.” “अरे! जरा शांत हो. एवढी कशाला चिडतेय. फक्त स्माईल केली तिने आणि मी पण. बाकी काही नाही मला अजून नाव पण नाही माहित तिचं” “नावाचं काय तिच्या त्या टी-शर्ट वर आहे आणि स्माईल च म्हणशील तर तू गप्पच बस तुला माहिती आहे ती कोणती स्माईल होती.” “बरं, बरं! आता ऑर्डर घेऊन येतो थांब! थोडं शांत कर डोक नायतर कॉफी घश्याखाली जाणार नाही.” “टाइम लावतेय मी, ५ मिनटात नाही आलास तर मी तुला तिथे येऊन मारणार. बाकी मला काही माहित नाही.”
मला माहित आहे ती बोलली कि खरंच करणार आणि मग काय आलो मी लगेच ऑर्डर घेऊन. आता आमची मस्ती सुरू, पूर्ण कॅफे मध्ये आमचाच आवाज सुरु होता. दोन वेळा मॅनेजर वॉर्निंग देऊन गेला आणि तिसऱ्या वॉर्निंग ला आम्ही बाहेरच निघालो मग. खरंच काही भेटी काही व्यक्ती नाही बदलता येत आयुष्यात. ते क्षण सुद्धा जे सोबत घालवलेले असतात आपण एकत्र. ती भेट त्या कॉफी शॉप मधली माझ्या काही आवडत्या गोष्टींमधली एक आहे कायम राहील.