एका कॉल वरून सुरू झालेली कहाणी
रोजची कहाणी, कामावर जायची वेळ. पंकज जागृतीच्या कॉल ची वाट पाहत होता. नेहमीप्रमाणे सकाळी आठच्या सुमारास जागृती कामावर जायला निघाली. बिल्डिंग मधून बाहेर येऊन ती रस्त्याच्या साईडला उभी राहून रिक्षाची वाट बघत होती. हातात नुकताच फोन घेणार तितक्यात एक गाडी तिच्यासमोर येते. त्यातून दोन तीन जण उतरतात आणि त्यातला एक जण तिला चाकू दाखवून तिला गाडीमध्ये बसवतो. ते तिला त्यांच्यासोबत घेऊन जातात. आजूबाजूचा परिसर जास्त रहदारी नसलेला असल्यामुळे त्यांना ते करणं जास्त सोपं गेलं. तो वाट बघत होता “अजून कॉल कसा आला नाही आणि मेसेज पण नाही, बिझी असेल कदाचित ती करेल काही वेळाने.”
पंकज आणि जागृती हे नवे नवे प्रेमात पडलेले आणि ह्याची खबर त्यांच्या काही खास मित्रांना सोडून बाकी कोणालाच माहित नव्हती. तिला त्याच्यात ते प्रेम मिळालं त्यामुळे तिने त्याला पहिल्या प्रपोजल मधेच होकार दिलेला. पण स्वतःचं आयुष्य जरासं स्टेबल झाल्याशिवाय काहीही करायचं नाही अशी अटच त्या दोघांनी एकमेकांना घातलेली. आता तिच्या कॉलची वाट बघता मन काही स्थिर राहवेना! सतत प्रश्नांचा भडीमार. याचं कारण असं की दोघांची ऑफिसला जाण्याची वेळ जवळपास सारखीच होती. त्यामुळे ती घरातून निघाली की त्याला न चुकता कॉल करायची. जर कधी कॉल करायला जमलं नाही तर “आपण आज मेसेज वर बोलू” तस सांगायची. पंकज ऑफिसजवळ पोहचला, “अजून हिचा कॉल आला नाही ?” सारखं स्विच ऑफ ऐकून आणि रेंज मध्ये नाहीये असं ऐकून तो बेचैन झालेला. शेवटी तिच्या आईला कॉल करून विचारायचं ठरवतो आणि तितक्यात त्याला एक कॉल येतो तो नंबर ओळखीचा नसल्यामुळे पटकन कॉल उचलतो.
“पंकज बोलतोय ना? आता नीट ऐक, जर तुला ती परत हवी असेल सुखरूप तर गपचूप आमच्या कॉलची वाट बघायची. आम्हाला काय हवं ते सांगू तुला, कुठे यायचं ते पण सांगूच आणि हो कुणाला सांगायचा शहाणपणा केला ना! तर समजून जा तीचं काय होईल ते. त्या सगळ्याला तू जबाबदार असशील लक्षात ठेव !” तो पुढे काही बोलायला जाणार तितक्यात कॉल कट झालेला. पुन्हा त्याच नंबर वर कॉल करून काही उपयोग झाला नाही कारण तो ही स्विच ऑफ येत होता. हे असं होईल त्यांना कुणालाच वाटलं नव्हतं. सहाजिक आहे त्याचं घाबरणं तिच्या काळ्जीपोटी आणि अशा बिकट परिस्थितीत काय करावं हे न उमजणं स्वाभाविक होतं.
सतत तिला कॉल करून तो रडायलाच लागला होता. काही वेळ शांत होऊन त्याने काही मित्रांना कॉल लावायला सुरुवात केली पण अश्या वेळी ते जागेवर असतीलच असं नाही ना! प्रत्येकजण त्याच्या त्याच्या कामात असल्यामुळे त्याला एक उत्तर मिळणं साहजिक होत. “काय झालं सकाळीच कॉल केला, आपण भेटू ना संध्याकाळी तेव्हा बोलू” हे असं ऐकणं यासाठी होतं, कारण तो जे झालंय ते कुणाला सांगू शकत नव्हता. त्याला तशी ताकीद देण्यात आली होती. ऑफिसला न गेल्यामुळे तिथून फोन कॉल चालू होते. वैतागून तो एका ठिकाणी येऊन बसला त्यांच्या फोन कॉलची वाट बघत. ऐनवेळी कुणाचाच प्रतिसाद नसल्यामुळे तो अधिकच खचून गेला. तो तरी काय करणार कुणाला दोष देणार होता, जे झालं ते होणार होतं हे त्याला तरी कुठे माहित होतं.
आता त्यांच्या कॉलची वाट बघण्याखेरीज काही एक पर्याय उरला नव्हता. वेळही हळू हळू सरत चालली होती, कोवळ्या उन्हाची उब निघून आता टोचऱ्या उन्हात बदलत चालली होती. आता जवळपास १२ वाजत आलेले. तब्बल २ तास उलटून गेलेले आणि तरीही त्यांचा कॉल आलेला नव्हता. आणि त्याच नंबरला पुन्हा कॉलही लागत नाही म्हटल्यावर तो हताश झालेला. काय झालंय काहीच कळायला मार्ग नव्हता शिवाय वाट पाहण्याच्या. डोळे पाणावलेले, चेहरा भीतीने घाबरलेला आणि शरीर घामाने भिजून गेलेलं. तितक्यात हातातला फोन वाजतो तो ही नंबर ओळखीचा नसल्याने पटकन कॉल उचलतो आणि समोरून आवाज येतो “पंकज, मी ऋतुजा बोलतेय. आहेस कुठे तू? ना मेसेजचा रिप्लाय करत आहेस ना कॉल उचलत आहेस ?” “ऐक ना मी आता जरा बिझी आहे नंतर करतो तुला कॉल” असं म्हणूनं तो कॉल कट करतो.
वाट पाहून आता बराच वेळ झालेला पोटात अन्नाचा कण नाही, पाणी नाही तसंच एका ठिकाणी बसून फोनकडे एकटक बघत होता. यावेळी पुन्हा एकदा रिंग वाजते आणि तो कॉल उचलतो “काही बोलायच्या आधी ऐक, एक पत्ता पाठवलाय त्यावर यायचं आणि एकटं यायचं कुणाला कानोकान खबर लागली नाही पाहिजे. समजलं ना!” तो मेसेज चेक करतो त्यात त्याला तो मेसेज मिळतो. तो लगबगीने रिक्षा पकडतो आणि स्टेशनकडे जायला निघतो. मनात विचारांचा डोंगर आणि काय होणार या काळजीने तो गुंफून गेलेला. विचारत विचारत अखेरीस तो त्या पत्त्यावर पोहचतो. ती जागा पाहून तो भारावून जातो… Continue Reading