घरून काम की घरातलं काम!

नेहमीच अवघड असतं असं काम करताना…

घरून काम की घरातलं काम!

मुद्दा असा आहे की, हे जे काय सुरु आहे ना! “वर्क फ्रॉम होम” ते आहेच सुरु, पण त्याचं सध्याला “वर्क फॉर होम” झालंय. घरातली कामं आधी करा मग कामं करा. म्हणजे आधी कामं करत नाही म्हणून बोलायचं. पण कोणती कामं आधी आणि नंतर करायची ह्याचा विचार कोणी करतच नाही. हातातली कामं सोडून बाकीची काम करायची म्हणजे सगळ्याचा बट्ट्याबोळ. “घरात काम नाही केलं तर घरात ओरडा, घरातून काम नाही केलं तर तुम्ही ताबडतोब कामावर या. घरी बसून तुम्ही आराम करता, काही ही काम करत नाही.”

सगळ्यांना माहित आहे सध्याची परिस्थिती. कोणाच्या कामापासून ते कोणाच्या वैयक्तिक जीवनापर्यंत, किती त्रास आणि किती कटकट सहन करावी लागते. हे फक्त त्यांचं त्यांना माहित असतं. त्यात सगळ्यांना सांगून होणार तरी काय आहे. कोण येऊन आपली करून तर देणार नाही ना! त्यांना त्यांचंच जड झालंय आपल्याला काय मदत करणार. हा! आता कोणा आपल्या माणसाजवळ मन व्यक्त करत असणारच. पण ज्यांना कोणीच नाही त्यांनी मात्र स्वतःची काळजी घ्यावी.

आजकालचा सगळ्यात जास्त वेळा विचारण्यात येणारा प्रश्न म्हणजे काय चाललंय? कामाचं काय? नसेल तर बघ आता सध्या गरज आहे. किंवा जॉब असला तर सोडू नकोस सध्याची परिस्थिती बघतोय ना आपण! धरून राहायचं आपलं काम, काही नाही थोडं सहन करायचं. हे लेक्चर संपत नाही तर दुसरा प्रश्न तयार च, लग्नाचं काय? कधी करताय लग्न? हा प्रश्न विचारण्यामागे नक्कीच कोणतं तरी अजाण सुख त्यांना मिळत असणार आहे. कारण लोकांना तो प्रश्न सारखा-सारखा विचारून कंटाळा नाही येत ना!

इच्छा तर बऱ्याच जणांची आहे ऑफिस ला जाऊन काम करायची पण करणार काय! काही लोकांच्या वैयक्तिक मतभेदांमुळे नाही जमत ते. त्यांच्या सफेद कमाईमुळे सगळ्याचं वाटोळं करून ठेवलंय ना! त्याला आपण काहीचं नाही करू शकत. अपर्यायी गोष्टी आहेत ह्या. घरातल्या लोकांनी पण थोडसं समजून घेतलं तर बर होईल. त्यामुळे आहे तेच ठीक आहे. असं म्हणून जमेल तसं स्वतःला जपण्यात शहाणपण आहे. अथवा वेडं व्हायला वेळ लागणार नाही, नाही का?

@UgtWorld

Related Posts