का कोणी तिसरं मध्ये येतं कोण जाणे?

का दोघांचा क्षण नेहमी वाटला जातो!

का कोणी तिसरं मध्ये येतं कोण जाणे?

हि एक साधी गोष्ट असावी म्हणा! पण जेव्हा जेव्हा आपण एखादी गोष्ट ठरवतो तेव्हा आपण आपल्यापुरती तिला ठेवतो. मग का कोण जाणे कुठून चंद्र तारे फिरतात आणि कोणी ना कोणी त्या वाटेला येऊन मिळतं. हवा असणारा सगळा वेळ दुभाजला जाऊ लागतो. इतका राग मनात चढत असून चेहऱ्यावर मात्र हसू ठेवावं लागतं. कारण आपण बोलणार तरी कसं ना! “जा इथून आम्हाला आमचा वेळ आमच्या हिशोबाने घालवू द्या.”

कधी कधी वाटतं हे तर नेहमीचच झालंय. म्हणजे दर वेळी असं नाही पण बहुतांश वेळेला तर हे होतंच असतं, नाही का? मला तरी वाटतं आता कित्येक जणांच्या मनात त्यांचे किस्से डोळ्यासमोर आले असतील. कसं त्यांनी सावरून घेतलं असेल त्या क्षणाला किंवा त्या वेळेपुरतं देव जाणे. साहजिक आहे की, आपल्याला हवा तसा वेळ घालवण्यासाठी आपण किती धडपड करतो हे आपल्याला माहित असतं. एवढं करून मग त्याच्या बदल्यात आपल्याला हे सगळं मिळतं.

बरं हे झालं आपलं मन. पण ती तिसरी व्यक्ती कोण आहे आणि त्याचं आपल्याशी काय नातं आहे यावर पण विचार करावा लागतो. म्हणजे जर आता आपण आपल्या खास माणसाबरोबर फिरायला गेलोय, तिथे जर का त्याचे किंवा तिचे मित्र भेटले तर आपल्याला नमतं घ्यावं लागतं. किती काही केलं तरी आपण त्या क्षणी काहीही करू शकत नाही. त्यात ती तिसरी व्यक्ती आपला सगळा वेळ खाऊन जाते आणि निघून जाते. मग शेवटी उत्तर मिळतं “चल! आपण पण निघू, उशीर होईल परत घरी जायला.” अपर्यायाने चेहऱ्यावरच्या उगवत्या सूर्याला पूर्वेकडेच मावळावं लागतं.

हे ऐकून त्यावर चिडावं की हसावं हेच समजता समजता डोक्याचा भुगा झालेला असतो. कारण पुन्हा किती ही लवकर भेटण्याची तयारी केली तरी लवकर भेट होणं हे फार मुश्किल असतं. जरी समोरच्याला ते मामुली वाटत असलं तरी आपल्या मनात ते खलत राहतच ना! इतकं सगळं ठरवून आपण अंततः काय मिळवावं तर आपल्या वेळेला मिळालेला उसना भागीदार. अजून नको बोलायला नाहीतर भेटी गाठींची नामुष्की होईल. अर्थात असं होत नाही पण आजकाल काहीही होऊ शकतं.

@UgtWorld




Write with us✍?

Greetings for Everyone from TeamUgtWorld! Anybody who wants to write whatever his/her Heart wants to. They can now publish their content with us at our platform @Ugtworld. For more information click on the following link…

Related Posts