सुखाच्या त्या गोष्टी परिस्थितीत विरून जातात!
आपण लाख विचार करतो सुखाच्या गोष्टींबद्दल. आपल्या दुःखाला पूर्ण विराम लागला असा विचार येतो, पण तसं होत नसतं पूर्णतः हे सर्वांना माहीत असतं. तरीही आपण दर क्षणाला त्याला पर्याय देऊन पुढे जात असतो. का तर आपल्या आयुष्यातील कित्तेक इतर गोष्टी ही ह्या दुःखापेक्षा गरजेच्या असतात. जिथे आपण पावला-पावलांवर आपल्या आवडत्या सुखी क्षणांचा त्याग करत असतो.
करावंच लागतं आपल्याला, काय करणार आयुष्यं असंच असतं. पण दर वेळी असं कसं करून चालेल असाही प्रश्न पडतोच ना! प्रत्येक वेळी जर आपण आपल्या मनाला आवर घालत गेलो तर मग आपण काहीही करू शकत नाही. मग आपण फक्त आपल्या जाळ्यात अडकून राहू. म्हणजे कोणताही अडथळा आला की आपण फक्त त्याग करत राहू स्वतःसाठी, दुसरं काहीही नाही. आवडीला कुलूप लागून जाईल आणि जे कालांतराने गंजून ही जाईल.
कुठेतरी याला आळा घालता यायला हवा. आपल्याच लोकांना आपण थोडंसं अंतर दिलं पाहिजे. जे खरंतर करणं गरजेचं असतं. कारण काही जण आपले जवळचेच आपला गैरफायदा घेतात आणि आपल्याला रडकुंडीस आणतात. अगदी सहज भोळेपणाचा आव आणून त्यांचं काम करून घेतात आणि पुढे त्यांची कृतघ्नता असतेच. म्हणजे आपणच आपल्या चांगुलपणाच्या कार्यावर गुन्हेगार!
माणसाचा स्वभाव बदलत नाही हे खरं जरी असलं तरी एक दिवस परिस्थिती त्याला नष्ट व्हायला कारण होते . त्यांचं अस्तित्व हे फार काळ तसंच टिकून राहत नाही. मान्य आहे, न्याय होताना वेळ जातो, अगदी आपण आशा सोडून देतो तेव्हा ते सगळं होतं. पण वेळेला महत्व तर गोष्टीचं देतात ना! प्रत्येक गोष्ट ही सुखाच्या एक क्षण च दूर असते आपण फक्त तो क्षण जपून ठेवायचा. त्या एका क्षणात बऱ्याच दुःख असलेल्या गोष्टी संपवण्याची ताकद असते.