काय मग किती लांब दौरा?
किती तरी वेळा या वाक्यांचा मारा आपल्या कानावर पडला असेल आपल्या. पडला असेल कशाला पडतोच अजून ही. तीच मंडळी हो दुसरं कोण असणार! ज्यांना दुसऱ्यांच्या आयुष्यात जास्त रस असतो. ज्यांना स्वतःचं आयुष्य तितकंसं रोमांचक वाटत नाही. त्यांना इतर लोकांच्या हालचाली जपण्यात जास्त मजा येते. मग येतात समोरून असे प्रश्न काय मग आज कुठे, फिरायला की काम?
एखादा कुठे निघत असेल तर त्याला टोकण्यात लोकांना जास्तच मजा येते. जसं की आपलं काम तेच करून देणार किंवा लगोलग आपल्या सोबत येऊन आपल्या मूडची वाट लावणार. का पण का? कधी कधी विचारावं वाटतं राहवत नाही का विचारल्या शिवाय तुम्हाला. नाहीतरी काही लोकांचा जन्मच यासाठी झालेला असतो विचारपूस आणि चुगल्या करण्यासाठी. त्यांना फक्त तेच दिसतं. हा इथे गेला होता, ती मला इथे दिसली. त्याला मी टपरी जवळ बघितलं.
मला एक कळत नाही मन भरत नसेल कदाचित किंवा मानसिक समाधान नसेल मिळेल त्यांना आपल्याला विचारल्या शिवाय. यात काही आपले मित्र सुद्धा असतात ज्यांना एकदा सांगून पण खरं वाटत नाही. मग मागाहून दुसर्यांकडे कुरघोड्या करत बसतात. काय गरज काय पण? तोंडावर बोला ना जे काय असेल ते. नाही सांगायचं आम्हाला काही गोष्टी तुम्हाला काय फरक पडतो तुम्हाला? सगळंच सांगितलं पाहिजे असं कुठे लिहून तर नाही ठेवलं ना! की कोणता करार करून ठेवलाय मैत्रीत.
वेळीच गोष्टी आणि माणसं पारखायला शिकायला हवय आता तरी. जी आपली म्ह्णून मिरवतो ना माणसं तीच आता आपल्या तोंडात शेण घालायला लागली आहेत. त्यांना आपण जो हक्क देऊन बसलो आहोत ना आपुलकीचा, तोंडाला येईल ते बोलायचा. त्याचेच हे सगळे परिणाम आहेत दुसरं काही. वेळेतच प्रतिउत्तर देणं सध्याला फार गरजेचं आहे. नाहीतर अशा बोगस प्रश्नांना आयुष्यभर उत्तरं द्यावी लागतील.
Sahi Hai
Shukriya, keep reading