Komal ‘s Poetic Blogs
Here, we can read blogs of the young blogger, Komal Lingayat. Must read her blogs and other write-ups and do comment and share with your friends and family!
माझी नि वेळेची गाठ पडली
माझी नि वेळेची गाठ पडली अशी एकदा
माझी तर वेळ चुकली होती अन ती तर म्हणा नेहमी वेळेवर असतेच! तर ती तिच्या वेळेवरच होती, मीच माझ्या चुकीच्या वेळी तिला भेटले.
मी तिला म्हटलं का बाई धावतेस सारखी? तुही नमतं घे की कधीतरी इतरांसाठी
तुला ग का नाही वाटत बदलावं कधीतरी,
आनंदात माझ्या तूही थांब कधीतरी…
सतत चालून चालून का बाई तुला
नाही येत कंटाळा ? थांब जराशी श्वास तरी घे जरासा…
त्यावर वेळेने मला उत्तर दिलं
ती म्हणाली आता वेळ नाही ग तुझ्या प्रश्नाची
उत्तरं द्यायला. तुलाच मिळतील तुझी उत्तरं, तु फक्त तुझ्या वेळेनुसार वेळेवर बदलायला शिक म्हणजे झालं आणि माझ्यासारखी सतत चालत रहा…
वेळेने दिलेलं हे उत्तर ऐकून मला जरा नवल वाटलं… तुम्ही म्हणाल यात नवल काय? तर तुम्हीच बघा माझ्या प्रश्नाची उत्तरं द्यायला वेळेला ही वेळ नव्हताच पण मी मात्र कायम असा विचार करते की वेळ आल्यावर सर्व प्रश्न सुटतील आणि चांगल्या वेळेला तासभर एकाच ठिकाणी थांबणं अन वाईट वेळेला सेकंद काट्याप्रमाणे धावणं जमलं म्हणजे आयुष्यात आपण वेळेवर आहोत…