महात्मा ज्योतिबा फुले यांची सामाजिक कार्ये- Social Work Done by Mahatma Phule
महात्मा ज्योतिबा फुले यांना या प्रश्नाचे उत्तर कधीच सुचत नसत की इतका मोठा देश गुलाम का आहे? फुलेंना गुलामगिरीचा अतिशय द्वेष होता. त्यांना कळून चुकले की जाती-धर्मांमध्ये विभागलेल्या या देशातील सुधारणा तेव्हाच शक्य आहे जेव्हा लोकांची मानसिकता सुधारेल. त्याकाळी समाजात वर्गभेद शिगेला पोहचला होता. महिला आणि दलित लोकांची स्तिथी दयनीय होती. त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. या परिस्थितीवर मात करण्यासाठी त्यांनी महिला आणि दलितांच्या शिक्षणाचा विडा उचलला. त्यांचा विश्वास होता की स्त्रियांना शिक्षण दिले तर पुढील पिढी घडवणाऱ्या मातांकडून त्या पिढीवर चांगले संस्कार होतील. म्हणूनच मुलींना शिक्षण देणे त्यांना योग्य वाटले.
वंचितांच्या शिक्षणासाठी शाळांची व्यवस्था करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्या वेळी जाती भेदभाव खूप शिगेला पोहोचला होता. दलित आणि महिलांच्या शिक्षणाचा मार्ग बंद होता. ही व्यवस्था मोडण्यासाठी ज्योतिबा आपल्या घरात दलित आणि मुलींना शिकवत असत. ते मुलांना लपवून आणत आणि पोहचून देत. जसे त्यांच्या या सामाजिक कार्याचे समर्थक वाढले तसे त्यांनी उघडपणे शाळा चालविणे सुरू केले.
शाळा सुरू झाल्यानंतर ज्योतीबांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यांच्या शाळेत कोणीही शिकवायला तयार होत नव्हते. जरी कोणी शिकवले तरी सामाजिक दबावामुळे त्याला लवकरच हे काम थांबवावे लागतं. या शाळांमध्ये कोण शिकवणार ? ही एक गंभीर समस्या ज्योतिबांसमोर निर्माण झाली होती. ज्योतीबांनी या समस्येवर उपाय शोधण्यासाठी आपली पत्नी सावित्रीला शिकवले आणि त्यानंतर नॉर्मल स्कूल ऑफ मिशनरीमध्ये प्रशिक्षण घ्यायला लावले. प्रशिक्षणानंतर ती भारताची पहिली प्रशिक्षित महिला शिक्षिका बनली.
त्यांच्या या कार्यामुळे उच्च प्रवर्गातील जाती समाजातील लोक संतापले. जेव्हा सावित्रीबाई शाळेत जात तेव्हा लोक तिला वेगवेगळ्या प्रकारे अपमानित करीत असत. त्यांच्यावर शेणगोळे मारण्यात येई. शिवीगाळ करण्यात येई. पण त्या महिलेने एवढा उपमान होऊन सुद्धा आपले काम चालूच ठेवले. यावर लोकांनी ज्योतीबांना समाजामधून काढून टाकण्याची धमकी दिली आणि त्यांना त्यांच्या वडिलांच्या घरातून काढून टाकले.
घरातून बाहेर काढल्यामुळे ज्योतिबा आणि सावित्रीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण ते आपल्या ध्येयातून कधीही हटले नाही. ती एक काळी रात्र होती. जिला कुठेतरी उगवता सूर्य नक्की असणार हा ज्योतिबांच्या विश्वास होता. महात्मा ज्योतीबांना घरी परतण्यास उशीरा होत होता. ते सरळ घराकडे जात होते. विजेचा लखलखाट होण्याच्या वेळी, त्यांनी वाटेत दोन माणसांना हातात चमकदार तलवारी घेऊन जाताना पाहिले. त्यांनी वेग वाढविला आणि त्यांच्या जवळ गेले. महात्मा ज्योतिबा यांनी त्यांना आपला परिचय विचारला आणि अशा रात्री जाण्याचे कारण विचारले . तेव्हा त्यांनी सांगितले की आम्ही ज्योतिबाला मारण्यासाठी जात आहोत.
महात्मा ज्योतिबा म्हणाले त्यांना मारून काय मिळणार? ते म्हणाले आम्हाला पैसा मिळेल, आम्हाला पैशांची गरज आहे. महात्मा ज्योतिबाने क्षणभर विचार केला आणि मग ते म्हणाले मला मारा , मी ज्योतिबा आहे, मला मारून तुमचे हित होत असेल तर मला आनंद होईल. हे ऐकून त्यांच्या तलवारी खाली पडल्या. ते ज्योतिबांच्या पाया पडले आणि त्यांचे शिष्य झाले.
२४ सप्टेंबर इ.स.१८७३ रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. सत्यशोधक समाज सोसायटीचे ते पहिले अध्यक्ष आणि खजिनदार होते. त्यांनी जातीय भेद आणि चातुर्वर्णीय भेदभावास विरोध करण्यास सुरवात केली. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली तेव्हा स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाई यांनी केले. सावित्रीबाई यांच्याबरोबर १९ स्त्रियांनी सत्यशोधक समाजाचे कार्य सुरू केले. त्याचवेळी त्या कन्याशाळेच्या शिक्षिका म्हणूनही कार्य करीत होत्या.आपल्या हयातीत त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली.
सत्यशोधक समाज भारतिय सामाजिक क्रांतीकरीता प्रयत्न करणारी एक अग्रणी संस्था ठरली. महात्मा ज्योतिबा फुले यांनी लोकमान्य टिळक, गोपाल गणेश आगरकर, न्या.रानडे, दयानंद सरस्वती यांच्या समवेत देशातील राजकारणाला व समाजकारणाला पुढे घेऊन जाण्याकरता देखील प्रयत्न केले परंतु जेव्हां त्यांना या मंडळींची भुमिका अस्पृश्यांना न्याय देणारी नव्हती हे जेव्हा ज्योतिबांना समजले तेव्हा त्यांच्यावर देखील त्यांनी टिका केली. त्यांनी अशीच टीका ब्रिटिश सरकार, राष्ट्रीय सभा व काॅंग्रेस विरोधात देखील केली.
Write with us✍?
Greetings for Everyone from TeamUgtWorld! Anybody who wants to write whatever his/her Heart wants to. They can now publish their content with us at our platform @Ugtworld. For more information click on the following link??