क्षणभंगूर किस्से ही…
दरवेळी मन मारून स्वप्नांमध्ये राहणं हे काही योग्य नाही. किमान त्यासाठी प्रयत्न तर करता आलं पाहिजे. आपण कित्येक गोष्टी या अशा पद्धतीतच अपुऱ्या ठेवून देतो अथवा सोडून देतो. ज्याचा आपण अगदी दिवसरात्र विचार केलेला असतो. खरोखरच काही गोष्टी आपल्यासाठी क्षणभंगूर असतात.
का ही भीती मनात यावी काही करण्याआधीच आपल्या. का असा पारा चढावा ह्या घाबरट वागणुकीचा दर वेळी. ज्या ठिकाणी तुमची मदत हवी असते स्वतःला. तिथेही तुम्ही स्वतःला मदत करू शकत नाही. म्हणजे आत्मविश्वासाला तडा गेल्याचे जास्त प्रादुर्भाव दिसत आहेत. जे कोणत्याही प्रकारात चांगलं वाटत नाही.
आपण क्षणाक्षणातून अनेक किस्से रंगवतो पण ते क्षणिक असतात, हे मात्र विसरून जातो. ह्या जगात मुळातच काही शाश्वत असं नाही. अगदी काहीही नाही. ज्या आंधळ्या मनाने आपण सेटल होऊन निवांत आयुष्य घालवू असं म्हणतो ना! ते तस मुळातच अस्तित्वात नसतं. आणि ते असलं तरी फार कमी वेळेसाठी असतं.
“क्षणभंगूर हे सारे क्षण, सुख दुःख ही क्षणभंगूर रे, तू साद घाल मनाला अशी की ऐक हे क्षणभंगूर किस्से रे”
Write with us✍?
Greetings for Everyone from TeamUgtWorld!Anybody who wants to write whatever his/her Heart wants to can now publish their content with us at our platform @Ugtworld.For more information click on the following link??