जबरदस्तीची मदत नकोच करायला!
नको वाटतं कधी-कधी कोणामध्ये पडायला. मदत करायला नको वाटतं. खरंच वाटत असेल का गरज त्यांना. फक्त आपलं मन खातं म्हणून पडायचं या वादात. नक्की मिळणार काय पडून त्यात.
ज्याला ज्या गोष्टींचा त्रास होतो, त्यात आपली लुडबुड असायलाच हवी का? असावी तर का? आणि नसावी तरीही असं का? मला तरी वाटत जोवर समोरून हाक येत नाही तोवर मदत नाहीच करावी. पण दर वेळी असं करावं असं नाही! जर नाही म्हणत असणार तर त्याचं कारण वेगळं असेल. जे असं आहे की जर आपसूकच मदत केली आणि ती नावडती ठरली तर. तर त्या क्षणाला दोन व्यक्ती दुखावल्या जाणार यात तिळमात्र शंका नाही.
त्यामुळे वेळेचा आणि समोरच्याचा आढावा घेत, मुळात त्याच्या मनाचा हेतू जाणून घेऊन बोली करावी. त्या बोलण्या चालण्यात काही आलंच समोर तर सगळंच समोर येणार. कधी निरागस पणा ही सांभाळावं लागतो. तो नेहमीच सहज आणि साधेपणात जात नाही. त्याचा तिरस्कार सुद्धा तितक्याच वेगाने होतो. आणि नात्यामध्ये अबोला सुद्धा येऊ शकतो. अगदी सहजतेने.
त्यापेक्षा काय गरज आणि का असावा हा जीवघेणा मदतीचा खेळ. नकोच मी म्हणेन. लागलीच मदत तर करता येते, नाहीतर शब्द खेळ असतातच.
Write with us✍?
Greetings for Everyone from TeamUgtWorld! Anybody who wants to write whatever his/her Heart wants to. They can now publish their content with us at our platform @Ugtworld. For more information click on the following link…