मैत्री ज्यात सोबत, बोलणं, सहवास असतोच!
आपल्या या आयुष्यात दोन गोष्टी गरजेच्या आहेत मानसिक आरोग्यासाठी, त्या म्हणजे एक तर प्रेम आणि त्यासोबत मैत्री, त्या मध्ये असणारा जोडीदार. हो मला खात्री आहे, आपल्यासाठी कोणीतरी असणं किती महत्वाचं असतं यावर बहुतेक जण सहमत असतील. साहजिक आहे, कायम साठी नाही पण गरजेच्या वेळी तरी! किमान अशा लोकांसोबत तरी नकोच जे आपला गैरफायदा घेतात. पण खरं सांगायचं तर जे आपल्या सोबत खरेपणाने असतात ते आयुष्यात आपल्याला पुढे जायला आणि आयुष्य जगायला शिकवतात.
आयुष्य जे आपल्याला जगायचं असतं, घरी नाही, कोणत्याही एकलकोंड्या ठिकाणी नाही. परंतु सगळीकडेच, जिथे तुमचं अंतर्मन मोकळीक स्पर्शू शकेल. तिथेच मला ती मैत्री सापडली जी फार गरजेची होती माझ्यासाठी. हो, मला ती सापडली जेव्हा नुकतंच माझं मन खोट्या मैत्रीतल्या लोकांपासून दूर झालेलं. सगळ्यांनीच आपापली वाट धरली जेव्हा त्यांचं माझ्याकडचं काम संपलं.
त्यांनी फक्त एक रिकामा डब्बा म्हणूनच माझा वापर केला त्यांच्या भावना, त्यांचा राग, त्यांचं असहाय्य झालेलं बोलणं असं सगळंच माझ्याकडे बोलायला. वेळ सरताच ते निघून गेले. खरंतर आपण दुसऱ्यांपेक्षा स्वतःकडून जास्त अपेक्षा ठेवायला हव्यात. पण मला नुकतीच मिळालेली मैत्री, त्यांच मन खरंच खूप चांगलं आहे. म्हणजे ज्या पद्धतीत ते माझं वागणं त्यांच्यासोबत हाताळतात तिथे माझ्याबाबतीत कोणतंही मत तयार करत नाही. असंच असलं पाहिजे, कोणतंही मत न ठरवता वास्तविकता स्वीकारली पाहिजे.
जेव्हा आपल्याच लोकांकडून घात होतो, जेव्हा मन भावनाहीन होतं. त्या वेळी ह्या मित्रमंडळींचं आगमन झालं. अखेरीस गोष्टी बदलल्या, सगळे इतक्या घट्ट मैत्रीच्या नात्यात येतील ये सगळ्यांनाच अनपेक्षित होत. पण हे सगळं फार कमी वेळेत झालं. वर्ष कधी कधी तोकडी पडतात काही क्षणांसमोर. जे क्षण वर्षानुवर्षे आपल्या सोबत राहतात. हे एक उत्तम औषध आहे कोणत्याही नैराश्यातून बाहेर येण्यासाठी. ना कोणत्या खोट्या भावना, ना पाठीमागे बोलणी, फक्त अस्सल मैत्री!