“मंदौस” चा हैदोस, समुद्राचा इशारा?

समुद्राचा हैदोस की प्रकृतीची नकळत सूचना!

आपला देश तीनही बाजूंनी समुद्राने वेढलला आहे. भारतीय सागर किनारे भारताला मिळालेले एक वरदान आहेत असं देखील आपण म्हणू शकतो. तेरा राज्यांच्या सीमा समुद्राला जोडल्या असल्याने आपल्या देशाची अर्थव्यवस्था काही अर्थाने सागरी किनाऱ्यांवर अवलंबून आहे. परंतु जेवढा फायदा ह्या सागरांमुळे देशाला होताना दिसून येतोय तेवढेच त्याचे धोकेही आपल्याला झेलावे लागत आहेत. समुद्राचा इशारा आणि त्यातून दिसणारी प्रकृतीची झलक.

आताच काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं एक वादळ म्हणजे ‘मंदौस चक्रीवादळ‘. या वादळामुळे आंध्रप्रदेश, तामिळनाडू व पुद्दुचेरी या तीन राज्यांत हवामान खात्याने रेड अलर्ट घोषित केला होता. या वादळाचा सर्वाधिक फटका तामिळनाडू राज्याला बसलेला दिसून येत आहे. चेन्नईच्या सागर किनाऱ्यावर अतिवृष्टी झाल्याने अनेक घरे व झोपड्या मोडल्या गेल्या, तसेच माम्मलापुरम या जिल्ह्यामधे भुस्खलनाची घटना घडताना दिसून आली. या वादळाने आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला असून मानवी जीवन विस्कळीत झाले आहे. तामिळनाडू वगळता महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये देखील काही अंशी वादळाचा परिणाम दिसून येतो आहे. या दोन राज्यांच्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता जरी वर्तवण्यात आली असली तरी सद्ध्या फक्तं तापमानामध्ये उतार जाणवत आहे.

भारतामध्ये येणाऱ्या वादळांचा अभ्यास करता दिसून येते की आतापर्यंत आलेल्या चक्रिवादळामध्ये बंगाल उपसागरातील वादळ निर्मितीची संख्या जास्त आहे. देशातील एकूण वादळांमध्ये ६५ टक्के वादळे ही बंगाल उपसागरात निर्माण होतात. याचं कारण म्हणजे “हवेचा प्रवाह.” पश्चिम किनाऱ्यावरील अरबी सागरातून थंड हवा वाहते. तसेच हवामान तज्ञांच्या मते “थंड महसागरपेक्षा उबदार महासागरात वादळांचे प्रमाण अधिक असते.” तसेच पश्चिमेकडील राज्यांच्या तुलनेत पूर्वेकडील राज्यांमध्ये  समतल भूभाग अधिक आहे. त्यामुळे येथील वादळांना वळण्याची संधी मिळत नाही, म्हणूनच ही वादळे अधिक शक्तिशाली असतात. त्यामानाने पश्चिमेकडील वादळांची दिशा मात्र नेहेमीच बदलत असते.

Mandous-cyclone

‘सागरी वादळे’ ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. वारंवार येणाऱ्या वादळांचा भारतीय किनारपट्टीला मोठया प्रमाणात फटका बसत आहे. त्यामुळे फक्त आर्थिकच नव्हे तर मानवी जीवन देखील धोक्यात येत आहे. या आपत्तीला बळी पडलेल्या लोकांना सरकार नुकसान भरपाई जरी देत असली तरी आजूनही ह्या आपत्तींसाठी योग्य ती उपाय योजना करण्यात आलेली नाही. सजीव सृष्टीला असलेल्या धोक्याला लक्षात घेऊन योग्य ती पाऊले उचलणे फार गरजेचे आहे.

सुहानी ✍️


Write with us✍?

Greetings to Everyone from TeamUgtWorld! Anybody who wants to write whatever his/her Heart wants to. They can now publish their content with us on our platform @Ugtworld. For more information click on the following link…

Related Posts