स्वतःचे मानसिक आरोग्य दुर्लक्षित न करता आयुष्याला नवी कलाटणी द्या
मानसिक आरोग्य याची सुरुवात होते ती त्याची योग्य ती काळजी घेऊन. आजकाल मानसिक समाधान ही गोष्ट फार गरजेची झालेली आहे. त्याच कारण असं कि मानसिक समाधान नसेल तर मनाला शांतता मिळणार नाही. ती जर मिळाली नाही तर मात्र असंख्य विचार आणि गोष्टी आपल्या मनात घर करून जातील. अर्थात आताही आहेत! त्याने त्या मनाचं आरोग्य खराब होत जातं. त्यामुळे ही छोटी गोष्ट नाही.
आपण म्हणायचो कि, मोठी माणसं मानसिक आजाराला बळी पडतात. पण कुमार वयात किंवा तरुण वयात असणाऱ्या मुलामुलींचे तर आधीपासून बळी जात आहेत. तेव्हा ही लक्ष नव्हतं आणि हल्ली तर कोणाला स्वतःकडेच बघायला वेळ नसतो. तर दुसर्यांकडे कोण बघेल. आजच्या घडीला प्रत्येक जण मानसिक रोग घेऊन जगतो आहे. काही जण ते दाखवत नाही आणि काहींना ते लपवता येत नाही.
सध्याच्या धावपळीच्या आणि सोशल मीडिया सारख्या बनावटी दुनियेत राहून स्वतःची काळजी घेण्यात सगळे असमर्थ ठरत आहेत. ज्या कडे आपण सहज दुर्लक्ष करतो. खूप गोष्टी उपलब्ध करून ठेवल्यात आजकालच्या जगण्यात. जेणेकरून आपण स्वतःची किमान काळजी घेऊ शकू. सध्या सगळ्यात जास्त चर्चेत असणारी गोष्टी म्हणजे ध्यान (Meditation) करणे. कित्येक गट बनवून त्याचे सेशन सुरु असतात. दुसरीकडे कॉऊन्सलिंगचे गट आहेत जे तुम्हाला सतत सांगत राहतात. मनात सहन होण्या पलीकडे काही ठेवण्याऐवजी ते बोला म्हणजे बरं वाटेल.
असे कित्येक प्रकार सध्याला सुरु आहेत. काही जण त्यात सहभागी होऊन करत ही आहेत. पण तरीही कुठेतरी ते कमी पडतंय असं वाटतं. ते अशासाठी की, आपल्याला समोरून कोणी काहीही आणि किती ही सांगू दे आपण ते अर्धवटच करणार. कारण ही मानसिक वृत्ती आहे. त्यात वाईट वाटण्या सारखं काहीच नाही. प्रत्येकाचं आयुष्य त्याच्या-त्याच्या पाऊलवाटेनेच सरत जात. हाच महत्वाचा मुद्दा आहे. स्वतःवर किमान विश्वास ठेवून स्वतःसाठी वेळ काढणं. ज्याचा फायदा नक्कीच मानसिक आरोग्यावर पडतो.
वेळ नसेल असं होतच नाही. आपण तो काढला पाहिजे. किती ही व्यस्त असु दे आयुष्य किमान वेळ आपल्या गोष्टींसाठी दिलाच गेला पाहिजे. कोणाच्या समोर असो किंवा कोणाच्या अपरोक्ष. काही गोष्टींमध्ये स्वार्थ पाहणं कधी कधी चांगलं असतं. आयुष्यात सगळ्यांनाच आपण पुरून उरू शकत नाही. सगळेच आपल्यामुळे खुश राहतील असं नाही. ज्याला त्याला त्याच्या त्याच्या गोष्टी असतात सुख-दुःख साजरं करायला.
आपल्या आयुष्यात असणाऱ्या माणसांना थोडा वेळ जास्त देऊन आपलं मन मोकळं करण्यात काहीच हरकत नाही. अगर त्यांना वेळ नाही तर तुम्ही एकटे पुढे व्हा कोणी ना कोणी तुम्हाला भेटणारच. जर तसं नाही झालं तर अश्या काही गोष्टी घडतील ज्यात तुम्हाला एकटेपणा वाटणारच नाही. प्रेम करा, त्याची सुरुवात मात्र स्वतःपासून करा. मित्र-मैत्रीण, आई-वडील, आपलं शिक्षण, आपलं काम आणि अश्या कित्येक गोष्टी आणि माणसं ज्यांचा प्रभाव आपल्यावर पडत असतो. जमेल तितकं स्वतःची काळजी घेऊन जास्तीत जास्त खुश राहण्याचा प्रयत्न करायचा.
जर काही आता नसेल नशिबात तर पुढल्या क्षणी त्याहून चांगलं काहीतरी नक्कीच असणार. स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष न करता आयुष्याला नवी कलाटणी द्या! नक्कीच मजा येईल.
Write with us✍?
Greetings for Everyone from TeamUgtWorld! Anybody who wants to write whatever his/her Heart wants to. They can now publish their content with us at our platform @Ugtworld. For more information click on the following link…