अवघा त्रास हा
इवलुशा मनापोटी
का तो जपावा मी?
काही साध्य नाही,
ना आहे मिळकत कोणती…
कशाला सांगू मनातलं मी
काय होणार त्याचा उपयोग,
कोण सांभाळणार मन माझे
कशाला करू दिखावा
त्याने काही नाही होत…
मी ना माझ्या मनी
कोण जाणे का असं,
इतकं का नाराज असावं मी
जे माझ्या मनालाही माहीत नाही…
वेळ सरावी पाण्यासारखी
अजून सहन होत नाही वेळ ही
मार्गी निघाव मन माझे
आणखी नको काहीही…
चलबिचल सतत, विचारांची गर्दी
मोकळीक नाही. नुसती हाणामारी
स्वतःच्या मनातच युद्ध स्वतःशी
कधी मिळेल जीवाला आराम
हे माहित नाही…
Nice
Thank you for your feedback.
Beautiful Words
Thank you so much Manoj…