पत्र फिरत आहे
भावनांनी भरलेलं,
कुणाच्या तरी प्रेमाने भरून
कुणाला तरी न्हाहून टाकणारं…
नको सहवास स्वतःचा
त्याची कधी-कधी भीती वाटते,
नको ते प्रश्न विचारून
हाल करतो माझे…
लिहायला मार्ग हवा ना
डोक्यात काही जायला हवं ना,
मी मेहनत करेन नक्कीच
माझी वाटचाल तर व्हायला हवी ना !
वाचा फोडता जरी
आली शब्दांना खरी,
अर्थाचा अनर्थ लावतात
हि वाचक मंडळी…
असतात माझी काही काम अशी
नाही आवडत सांगायला मला ती,
का सांगू पण मी, कोण तू माझ्यासाठी
माझ्यासाठी मी महत्वाचा, गरज नको कोणाची…
Nice
Thank you for your feedback.
Beautiful Words
Thank you so much Manoj…