आहे किती काही मनात
कसं बाहेर पडेल मनातून ठाऊक नाही,
सांगू नाही शकत, कोणाला भाव दाखवू कसे
असं करणं मला शोभत नाही…
कळत नाही असं नाही
पण कुठेतरी काहीतरी चुकतं,
प्रतिसाद नसतोच खरा खुरा
पण त्यामागेही काहीतरी लपलेलं असतं …
भय रुजलंय मनात
काही गोष्टींची लय ज्यात,
मिळवायला हवी मोकळीक यातून
नाहीतर अडकून राहायला होईल यात…
तुटती बाजू होती
म्हणून सावरता आलं नाही,
तुला नकोच ना नातं
म्हणून बोलायला ही आलो नाही…
पाऊलवाट हि मोकळीच
त्यावर मुसाफिर हवाय कोणीतरी,
मिळतील पाऊलखुणाही त्यावर
येईल कदाचित हमसफर कोणीतरी…
Nice
Thank you for your feedback.
Beautiful Words
Thank you so much Manoj…