UgtWorld

हरकत नको ना 
आता अबोला आहे तर,
माझं तुटतं मन हवं 
जर तुला बोलायचं नसेल तर… 

UgtWorld

नवा अबोला
नव्या गोष्टी,
जुनी मैत्री 
आणि त्यातलीच मस्ती…

UgtWorld

भान राहतच नाही 
हल्ली स्वतःमध्येच हरवतो,
तुला आठवून मी 
रोज एक नवे काव्य करतो…

UgtWorld

मिठीची आतुरता 
तुझ्या सहवासात हरवण्याची मजा,
हवीस तू जवळ अगदी जवळ 
नुसती सोबत नको मला…

UgtWorld

तू नसशील सोबत असं होणार नाही 
माझं लिखाण हे तुझं अस्तित्व आहे,
तू कितीही नाकारलं तरी 
ते न मिटता अजून उभरणार आहे… 

Related Posts

4 thoughts on “मराठी चारोळ्या

Comments are closed.