किती तो तिरस्कार, किती तो त्रागा
कुठेतरी थांब ना आता,
नको ही ओढाताण, नको हा आढावा
धीर धरून माझं मन तोडू नको आता…
सांभाळावं माझ्या मानाने मला
हद्द संपत चालली आहे सहनशक्तीची,
अनेक नवे दरवाजे उघडकीस आलेत सध्या
जावं कि न जावं अशी आहे परिस्थिती आता…
दुखी का असावं मी
भावनाशून्य का नसावं मी,
उगाच विचार का येतात मनात
विचारहीन का नसावं मी…
जिद्द, चिकाटी सारं असावं
दिखावा मात्र अजिबात नको,
खरेपणानं हरून घ्यावं
खोटेपणाचं जिंकणं नको…
उंच उंच ह्या गोष्टी
नाती झेपणं कठीण झालं,
माझीच झाली गुंतागुंत अन
माझंच मला हसू आलं…
Nice
Thank you for your feedback.
Beautiful Words
Thank you so much Manoj…