UgtWorld

अस्वस्थता नाचू लागते अशी
काही संगीत मिळतं तिला निराशेच लयीत
सुर-ताल छेडता येत नाहीत तेव्हा,
मनाचा तालच नसतो ना अश्या वेळी…

UgtWorld

नाही जमत असं दुतर्फी वागणं
कुणाला दुखावून समाधान मानावं,
कधीतरी समोरून विचारपूस करावी
का आधीच ठरवता, आपलं मत मांडण…

UgtWorld

निरागस त्या साजेस्या मनाला
का इतका ताण द्यावा आपण
फिकर नसावी नेहमी नेहमी
ठीक होत सगळे थोडा वेळ दिल्यावर…

UgtWorld

होतं असं बरंच काही
मनाच्या कोपऱ्यात जे रुजून जाई
वाट सरत नाही, मिळत नाही
कुठलाच श्वास शांत नसतो त्यावेळी..

UgtWorld

वेगळेपण हवंय मनासाठी
थोडं स्थिर व्हायला, थोडं सांभाळायला
वाटचाल सुरू नवी करायची
चुकलेली नाती गोड मानून संपवायला…

Related Posts

4 thoughts on “मराठी चारोळ्या

Comments are closed.