वाट मोकळी द्यावी विचारांना
उगा त्रागा नको स्वतःला
विसरावं मनात आहे जे
कशाला बाळगावं मनस्तापाला…
प्रतिसाद नकोय मला तुझा
त्याचा सहवास दे जरा
हवी असलेली जी ओढ आहे
तिला मिठीत घेऊन ये येताना…
त्रास असा नाही जाणवत
तो दिसून येतो चेहऱ्यावर
का कोण जाणे सहनशक्ती ही
जाते संपून एका वळणावर..
लिहायला मार्ग हवा ना
डोक्यात काही यायला हवं ना
मी मेहनत करेन नक्कीच
माझी वाटचाल तर व्हायला हवी ना…
साद गुंजत येते जवळ
ऐकू फार थोड आलं मला
किती अर्थ, किती प्रकार होते ते
सोडून गेले त्या सादेत मला…
Nice
Thank you for your feedback.
Beautiful Words
Thank you so much Manoj…