अशीच राहो

अशीच राहो तुझ्या डोळ्यातली नशा
त्या नशेत माझं जगणं असतं
अशीच राहो मैत्रीतली उब
त्यातचं माझं राहणं असतं
अशीच राहो जवळीक आपली
त्यातचं माझं वागणं असतं
अशीच राहो साथ तुझी
त्यातचं तुला जवळ ठेवणं असतं
अशीच राहो प्रेम संगत आपली
त्यातचं आपलं आयुष्य सरतं…

@UgtWorld

ताबा

ताबा

गुंता वाढत चाललाय मनाचा
त्याला थारा मात्र मिळत नाही
मनाजोगतं वागणं हे सारखं
हरवत आहे, लवकर उमगत नाही..
माझी हरकत कसलीच नव्हती
माझं एकच प्रेम होत सोबत
झुकलं माझं प्रेम तिच्या भावनांसकट
काय होत मनात, काय राहिलं?
फरक नाही दिसत मला
विचित्र प्रकार दिसतो आता
वागणं फरकातील आहे माझ्या
मला त्याचा ताबा हवा…

@UgtWorld

एक आस असावी

एक आस असावी

वाद-विवाद नेहमीचेच
थोडी समज जवळ असावी
प्रेम-विरह होतात अनेक
पण, त्या विरहात प्रेमाची ऊब असावी..
मायेने ज्या शब्द आले समोर
त्या ओठांना त्याची सर असावी
अबोल्यातील राग अधिक वाढेल
कमी करायला, बोलणीची चाल असावी..
गरज लागेल उमेदीची थोडीशी
न बोलता मनाची जवळीक असावी
मिटेल वाद, होतील संवाद पुन्हा
थोडीशी आशा जवळ नेहमी असावी…

@UgtWorld