शब्दांमधली दुनिया

शब्दांमधली दुनिया

शब्द आता दमून गेले
रंग उधळून हवा तेवढा
अर्थ त्यांचे अनेक काढले
त्यांचे मन दुखी झाले..
परतीचा मार्ग त्यांनी शोधला
भावनांचा समूह तेथे आला
थोडा दिलासा दिला त्यांना
क्षण ही त्या सोबत भेटीस आला
चर्चा सुरु केली त्यांनी..
विषय वाढू लागला आता
मुद्देसूद बोलणी मुळे शब्द
बोलून मोकळं झाला
अन सगळ्यांवर शब्दांचा मित्र
प्रभाव विजेता झाला…

@UgtWorld

उमेद

उमेद

उमेद मिळेल कशी कुठून कधी
सांगता येत नाही काही
एक छोटासा संवाद ही
खूप प्रेरणा देतो, भन्नाट असं काही..
मजेदार सुचतं मग विचार रंगतात
घडतं तसं विचार ठाम केल्यावरती
नव्या कल्पना फिरतात डोक्यात
त्याचा प्रभाव हा परिणाम होतो मनावरही..
छान सा सल्ला मिळतो
छान अशा व्यक्तींकडून
कधी मिळतो तो आपल्याला
सहज क्षणिक रागातूनही…

@UgtWorld

माहोल

माहोल

प्रेम-विरह झालाय माहोल सध्याचा
वाट नाही, मार्ग नाही कसल्याचा
भावनाहीन मनाची गाडी जी चालतेय उगाच
ज्याची ठिकाणं नाहीत त्याच्या वाटचालीच्या रस्त्यात..
इतका तिरस्कार, त्रागा स्वतःला जास्त
मावळत्या सूर्यातही नसेल इतका विस्तव
मन जळतं सतत विनाकारण, कारण जाणूनही
कोण जाणे या सर्वांचा कधी होईल अस्त..
मिळकत नसेल विचारांना, कैद असावेत भीतीत
निर्दयतेच्या काळोखात, ज्योत असावी विझलेली
एक चिंगारी हवी, एक ठिणगी फक्त बारीक
करेल उजेड, किरणे पसरतील लखलखती…

@UgtWorld