जवळ ये जरा
जवळ ये जरा
@UgtWorld
मिठीत घे मला
थरकाप झालेल्या
या शरीराला
आसरा दे आता..
मिळूदे ऊब ही
शरीराची शरीराला
स्पर्श होउदे आता
प्रत्येक त्या अंगाचा..
जवळीक होईल अजून
या स्पर्शखेळाने
सहवास खास होईल
अशा नजीक येण्याने…
गाठ-भेट
कधी वेळ लागला नाही
@UgtWorld
कधी उशीर झाला नाही
पहिल्यांदाच झालं असावं असं
आपण भेटलो आणि कविता झाली नाही..
आत्ताची भेट असते थोडी छोटी
पण दिवस जाण्या भेट पुरते ती
सार काही नाही बोलता येत त्यात, पण
काहीही म्हण मजा येते! भेट छोटी असो वा मोठी..
नेहमी सांगता येत ना, काही हरकत नाही
कधी कधी हरकत असून सांगता येत नाही
नकोच ती हरकत असंच ठीक आहे
हरकत आली की मनासारखं बोलता येत नाही…
मनातल्या भावना
थोडसं अंतर झालेलं
@UgtWorld
पण ते फक्त शरीराचं होतं
बोलणं मात्र मनात वाढत होतं
ते तुझ्या पुढे येण्याची वाट पाहत होतं..
भेटली आज आपली भेट सुद्धा
वाटलं छान! खूष झालो आता
किती वाट पाहिली आहे या डोळ्यांनी तुझी
ते गोड हास्य पाहून वेळच थांबली आहे आता..
तुझ्या असण्यात शब्द रचना तयार होतात
तुझ्या बोलण्यातून नवे शब्द मिळतात
या भेटींमधून खूप काही मिळतं
कधी मैत्रीतली ऊब, तर कधी प्रेमाची माया देतात…