जवळीक
तू मला सोडून जाशील
@UgtWorld
पण मी तुला सोडणार नाही
तू जरी माझी प्रेयसी नसली तरी
तुझ्याशिवाय कविता लिहिणं शक्य नाही..
मैत्री ना आपली मग भीती कसली
प्रेम तर होणं नाही मग काळजी कसली
मला माहित आहे थोडी जवळीक, थोडा सहवास आहे
पण मैत्रीतून प्रेमात जायला एवढं पुरेसं नाही..
खात्री होती, आता फक्त शक्यता वाटते!
नाही होणार काहीच पण आता होईल असं वाटलंच ना
विश्वास बसला आणि विचार जुळलेत,
हृदयही असतीलच
प्रेमात पडूनही मैत्रीत आहे असं दाखवतोच ना…
शब्द खेळ
किती मज्जा येते
@UgtWorld
तू माझी मी तुझा करायला
किती मस्तीखोर असतात शब्द माझे
मजा येते ना तुला प्रतिसाद द्यायला
आपण तर असतोच आपल्या धुंदीत गुंग
कोण सावरेल आपल्या या वागण्याला
नको ना! काही गरज वाटत नाही
तुला वाटते का सांग जरा मला?
वाटत तर नसेलच म्हणा आता
उगाचच विचारलं हे मी तुला,
किती शब्द किती संवाद असतात
शेवटच नाही मिळत ज्यांना विषय संपवायला
इथेच तर मजा येते ना!
कधी कमी पडतच नाही विषय आपण बोलताना…
एक स्वप्न
एक स्वप्न पाहिलं मी
@UgtWorld
त्या स्वप्नात काही विशेष होतं!
जिथे एक व्यक्ती वाट पाहत होती
तिच्या वाट पाहण्यात तिचं प्रेम दिसत होत..
जवळ गेल्यावर तिचं हसणं हळूच खुलून येताना दिसलं
किती गोड हसते तू अस तिला म्हटलं
तिचे गाल लाल बुंद झाले, जसं रंग मिसळतो पाण्यात
आता मात्र तिला पाहून मीच स्वतः हरवून बसलो..
तिने जागं केलं म्हटली बोलायचं आहे तुझ्याशी
मी म्हणालो हा बोल ना! आता तर ऐकायलाच आहे मी
मला तू हवा आहेस आणि मी मलाच हवा आहे
मी म्हंटल एकदा विचारून तर बघ
तू विचारण्याआधी च मी तुझा आहे…