आपुलकी
अशी ही साथ आपलेपणाची
@UgtWorld
ती पुरेपूर सार्थकी झाली
सोबत तुझी वेळेच्या सहवासातली
मनाला एक अनोखं सुख देऊन गेली..
किती आनंद झाला काय सांगू तुला
जेव्हा कोणी नव्हतं जवळ, तू आधार दिला!
आयुष्याचा भाग होणं साधी सोपी गोष्ट नाही,
तू माझ्या आयुष्याचा भाग आहे
या पेक्षा छान अजून काही नाही..
म्हणशील किती ही स्तुती किती हे शब्द माझ्यासाठी
हे तर काहीच नाही हे पण कमी आहे तुझ्यासाठी
आधी होतं, आता आणि नंतर देखील असच राहील!
तू राहशील सोबत आणि मला याची खात्री राहील…
मिठीतली भेट
प्रेमाचे वारे भिनू लागले अंगी
@UgtWorld
खरीखुरी तू जशी माझ्याच भोवती
स्पर्श हातांचा कोमल कोमल असा
एक गोड निशाणी माझ्या गालावर तुझ्या ओठांची..
मनी रमले स्वप्न तुझेच राणी
हृदयात निजले मन तुझेच होऊन तल्लीन
ही वाट अदृश्य ही साद अनोखी
तू मनकवडी झाली, ओळखते भाषा डोळ्यांची..
मिठीचं एक वेगळं जग, निरनिराळ्या मिठींची अदा
बाहूंमध्ये असं सामावते भिडते सर्वांगी नशा
अस्तित्व असावं प्रत्येक ठिकाणी माझ्याच मनी जास्त
कुशीतच सुरू होते आणि त्यातच संपते गोष्ट आपली…
वचन
एक वचन देता मी तुला
@UgtWorld
प्रेम फक्त तुझ्यावर करेन सदा
कधी कोणाला जागा देणार नाही त्या ठिकाणी
तू आणि तूच असशील तिथे माझ्यात..
तुलाही ठाऊक आहे आपलं नातं हे
वेगळं काही सांगावस असंही नाही ते
गोडव्याने भरलेली तू, त्यात मधासारखा मी
कोणालाही प्रश्न पडावे असे जग आपले..
मिठी आवडते मला तुझी, फार छान वाटत वाटतं
मन माझं जणू तुझ्याकडे सरल्यासारखं वाटतं
तुझं मन थोड फार बोलत असतं तस बरच काही
माझं-तुझं मन एकमेकांशी सतत बोलत असतं…