अरण्या-काठी

अरण्या-काठी

अरण्याच्या कुशीत नदीचा काठ
काठा शेजारीच अरण्याची छोटी वाट
वाटेतच सुगंधी फुलांची बाग
बागेसभोवती एका बाजूला आपला निवास..
संथ लाटा लाकडी घराच्या पायथ्याला
जेव्हा थंड स्पर्श देऊन गारवा गाईल गाथा
तुझ्या गुणगुणन्याने सांज होईल मग्न
त्यात रम्य होऊन मी बघेन फक्त तुला..
मी गीत रचेन नवं, तू चाल देशील त्याला
मिळून जे गाणं होईल सोबत गाऊ आता
धून एक सुमधुर हृदयाने बनवलेली आपल्या
तिची गुंज होईल सर्वत्र, ओठी फिरेल सगळ्या…

@UgtWorld

आपली समजूत

आपली समजूत

हरकत नसते हल्ली तुला
सहवास पुरवते वेळ मिळेल तसा
कसं जमणार वेगळं करायला मन
प्रेम पुरवठाच भरून ठेवलाय एवढा..
कळते तळमळ मनाची तुझ्या
जवळीक आपली वाढलीय ना जरा
समजू शकतो तगमग रोजच्या त्रासाची
मिळतो तितका वेळ सारते फक्त माझ्यासाठी आता..
सध्याच्या घडीला हे पण खूप आहे
समजूतीवर तर आपण जवळ इतके
प्रेम हळूहळू अजून रुजू लागलंय आपलं
जुनं नवं असं नाहीच, जस होतं तसच आहे ते…

@UgtWorld