जी मजा आहे

भेटून बोलण्यात जी मजा आहे
ती अशा बोलण्यात कुठे
डोळे पाहून बोलण्यात जी मजा आहे
ती नुसता आवाज ऐकण्यात कुठे
सहवासाचा प्रत्येक क्षण जवळ
ठेवण्यात जी मजा आहे
ती नुसतं ऐकून उत्तर देण्यात कुठे
हातात हात ठेवून तासन तास
गप्प राहण्यात जी मजा आहे
ती कोणत्याही प्रेमळ संवादात कुठे
न काही ठरवता अकस्मात भेट देऊन
आकर्षित करण्यात जी मजा आहे
ती नुसत्या शद्बातल्या वर्णनात कुठे…

@UgtWorld