
वाद
@UgtWorld
काही ना काही नवीन येतं च राहत
आणि जुन्या गोष्टींना आळा घालत असत
आपलेपणा असतो ना त्या जुन्या गोष्टींत
नवीन कितीही जवळ आलं तरी जुन ते आपलंच राहतं..
सवय झालेली असते ना त्या जुन्या गोष्टींची
एक वाट भेटलेली असते त्याच्या सोबतीची
तिथे नवं पण असतं चालतांना बाजूला
नव्याने घेतलेली वाट ही जुन्या पावलांची..
नवीन काय आणि जुनं काय
जे आपल्यासाठी चांगलं तेच योग्य असतं
दोन्ही गोष्टी किंवा माणसे जपली ना
असा वाद होणारच नाही मग…

उत्तर
@UgtWorld
छळ या मनाचा कोण करत
विचारल तर त्याच उत्तर नसतं
कस असेल ते शोधावं लागतं
नाही सापडलं तर ते सोडावं लागतं…
एकाच गोष्टीत नेहमी गुंतायचं नसतं
अनेक ठिकाणी मन रमवायचं असतं
कधी होईल अडचण अशा वेळी
पण त्या अडचणींना सामोरं जायचं असतं…
काही केल्या शांत बसाल खरे
कितपत हे सार याचा अंदाज येणार नाही
काही वेळ गप्प राहाल खरे
पण त्यातून प्रश्न मुळीच सोडवता येणार नाही…
प्रश्न आपल्याला पडलाय ना
मग त्याची सुरवात स्वतःला विचारा
दुसरे लाख उत्तरे देतील पण
स्वतःच मन काय म्हणतंय आधी ते ऐका…

मनमोकळा संवाद
@UgtWorld
आज बोललीस दिलखुलास पणे
मन झालं असेल हलकं
मोकळी असेल मनातली भावना आता
या विचारातून ते सांगणार कसं
आज सुद्धा ऐकताना बोलणं
एक वेगळंच हास्य होतं
तू बोलताना तुझ्या डोळ्यातून
माझं अस्तित्व तिथे स्पष्ट दिसत होतं…
जपून ठेवेन ते काळजी नको त्याची
ठेवलं आहे जे मन माझ्याजवळ
जितकं प्रेम आता आहे ना आपल्यात
तितकंच राहील ते कायमचंच…