
एक गोष्ट आणखी हवी
@UgtWorld
मला ही भेट आणखी हवीय
एवढीच कशी काय पुरणार
किती आणि कस बोलून होणार
तो पूर्ण करण्यासाठी आणखी एक शब्द हवा ना..
थोडं बोलणं होणार थोडं ऐकणं असणार
बोलण्यातून नवीन माहोल रंगात येणार
हसण्या खेळण्यात काहीतरी राहून जाणार
ते आठवण्यासाठीच आणखी एक संवाद हवा ना..
मैत्रीचे गुण आणि प्रेमाची ताजी धून
सहवासाचं हे गीत सोबतीची रुणझुण
संगतीची धुंद ही आपल्यातूनच येणार
ती येण्यासाठी आणखी एक भेट हवी ना…

नवी तू
@UgtWorld
अतरंगी मॅसेज जसा
रिंगटोन नवी तू
मनात रुजलेलं मन तुझं
रोमँटिक सिनेमा तू..
हवेतला स्पर्श तुझा
हृदयातली वाटचाल तू
सहवास बेभान तुझा
मनाची बेधुंदी तू..
शब्दातील सप्तर्षी रंग तुझे
प्रेमाचं इंद्रधनुष्य तू
भेटीचं वेगळं जग तुझ्यात
मला मिठीत साठवते तू..

भेट तुझी
@UgtWorld
एका भेटीमुळे इतकं काही सुचावं
आधीही भेटलो या अगोदर
कित्येक वेळा कित्येक ठिकाणी
एव्हडं लिखाण पहिल्यांदाच झालं असावं…
मस्त जुळत चाललीय चाल माझी
जशी जुळती बोलचाल आपली
आज तर हद्द झाली म्हणा
अर्धवट भेट उरकून घेतली..
चमक दिसतेय शब्दांवर
झळकतेय ती या लिखाणातून सहज
वाचताना तुला हसायला येईल
वेडा रे वेडा किती लिहितो एकाच व्यक्तीवर सत…