पावसाची सर

येता जाता ही पाऊसाची सर
त्यात वाहत्या वायाची नजर
तुझ्याकडून एकच गोष्ट हवी त्यांना
एक मिठी ज्यात तुझा जिव्हाळा जवळ.
भिजलेलं अंग तुझं जसे दव पानांवर
चेहरा खुलून आलाय तुला पाहिल्यावर
एक दोन थेंब ओठांवर पडताना
ओठानेच पुसले ते पाणी हो जे ओठांवर…
केसांची सुटका झाली खरी आता
त्यातही होते ते थंड पाणी लपून बघताना
जस तू फिरवली केस माझ्याकडे हळूच स्पर्श करत
शहारा आला अंगावर तुझ्यातल्या प्रेमाचा…

@UgtWorld

तुझं माझं असणं

अजून न कळाव का असं झालं
पाऊले वळली आणि समोरासमोर आलो
नकळत ती नजर अनपेक्षित अशी
मिळाली नजरेला आणि थोडे जवळ झालो..
जागा ती भरून टाकायची आहे
जिथे प्रेम कमी पडतंय तिथे
दिखावा नसावा तो पक्का सहवास असे
होईल जेव्हा मन एकीकडे एकतर्फी पूर्णपणे…
भावना त्या नेहमीप्रमाणे शब्दात येतात
वळण त्याला मग आपल्या आपल्यातच देतात
सध्यातरी तुझं माझं असणं दिसतंय
बाकीचे उगाच मध्ये मध्ये का येतात….

@UgtWorld

सलगी तुझी माझी

गुणगुणत जात रस्त्यातून
हाथ तुझ्या हातात असेल
मन जवळ असल तरी
लक्ष मात्र तुझ्याकडेच असेल.
हळूच खेचून घेशील तू
जरा नजर वर बघशील
आवाज त्या शब्दांचा मौन असेल
खांद्यावर डोक ठेऊन सोबत चालू लागशील..
आभाळातील ढंग भरून आलेत वर
पाऊसाच्या सरी येतील आपल्या अंगावर
छत्री पण नाही आता आपल्याकडे
शर्ट च घेतलं आता तू आपल्या डोक्यावर…

@UgtWorld