
एक गाठ
@UgtWorld
एक गाठ बांध म्हणतो मी
तू म्हणतेस, विश्वास नाही का
मी म्हणतो, स्वतःपेक्षा जास्त आहे.
तू म्हणतेस, मग ही गाठ का!
मी म्हणतो, यावी सतत आठवण यासाठी
तू म्हणतेस, त्याची काही गरज नाही
मी म्हणतो, ती तुझ्यासाठी नाही ती आहे माझ्यासाठी
तू म्हणतेस, विसरू नको मला खूप मार खाशील
मी म्हणतो, हे आहे त्याच पासून वाचण्यासाठी…

तुला पाहताना
@UgtWorld
तुला पाहताना मी उगाच हरवलो
तुझ्या बेधुंदीत स्वतःच गुंतलो
मग डोळ्यातून आलं तेज प्रेमाचं
मला का असं वाटलं तुझ्या मिठीत जागा झालो.
सुंदर का मनमोहक यात आता गडबड आहे
आकर्षक की, उत्कृष्ट याची गडबड आहे
कुठला शब्द शोधायला हवा
आता खरंच नाही समजत
इतकं अप्रतिम आणि गोंडस त्याच रूप आहे.

एक तू आणि एक पाऊस
@UgtWorld
एक तू आणि एक पाऊस
एक मी आणि माझी हौस
भिजायची इच्छा वेगळी
त्यात संधी नाचायची.
ओल्या अंगावर शहारे खूप
मिठीत भेटायला हवी प्रेमाची उब
ओठ जवळ यावे गालाशी सलगी करताना
भिजत्या सरी घेऊन होऊ खुश..
भेट ना आता अशा वेळी
करायचं आहे हे सारं पुढच्या क्षणी
घट्ट धरून ठेवेन हात तुझा
पुन्हा विचारेन होशील ना माझी!