
तुझा मी माझी तू
तू भावना असशील तर मी हृदय तुझंतू कविता असशील तर मी कवी तुझा
@UgtWorld
तू पान असशील तर मी ग्रंथ तुझा
तू अक्षर असशील तर मी अर्थ तुझा..
तू वाट असशील तर मी मुसाफिर तुझा
तू फुल असशील तर मी पाकळ्या तुझ्या
तू सुगंध असशील तर मी आस्वाद त्यातला
तू तू असशील तर मी पण तुझा..
तू चाहूल असशील तर मी भास तुझा
तू आवाज असशील तर मी सूर त्याचा
तू माया असशील तर मी मोह त्याचा
तू असशील माझी आणि मी असेन तुझा..

विषय तू
@UgtWorld
ह्या पावसाच्या धारा
करी तुझ्या मिठीचा इशारा
जशी उब असते त्या गोडीत
तसं स्पर्श करतो मला हा गार वारा
तू ना खरंच एक कविता आहेस
जी मला नेहमी लिहावीशी वाटते
कधी न संपणारा विषय आहे
जो मला सतत मांडावा वाटतो…

काहीतरी
@UgtWorld
गुंता सोडवायचा आहे थोडी मदत करना
प्रेम करायचं आहे जरा शिकवं ना
आता हसशील माझ्यावर म्हणशील काय झालं तुला
काहीतरी नवं करायचं आहे
सुरुवात इथून करेन म्हटलं
हरकत काय आहे या सुरुवातीला
फक्त मदत तर करायची आहे तुला
जास्त काही नाही लागत रे प्रेमाला
मैत्री आहे ना पुरेशी आहे याला
गरजेचं नाही प्रेयसी व्हावं तू
गरजेचं हे देखील नाही प्रियकर व्हावं मी
गम्मत आहे खरी यातच बघ
असच काहीतरी करुया चल…