
ऐकलंस ना तू
@UgtWorld
ऐकलंस ना तू मी काय म्हणालो
तुझ्या कानाजवळ हळूच आलो
फुंकर मारली हलकीशी श्वासातल्या हवेने
तुझे हावभाव बघून हसतच राहिलो..
हसता हसता रुसलीस तू माझ्यावर
तुला मनवता-मनवता नाकाचा शेंडा दिसला वर
आता काही खर नाही आपलं हे जाणवलं
तुझ्या जवळ येऊन शांत उभा राहिलो…
आता मात्र कमाल झाली
मी न काही बोलता स्वतःच हसली
हसून माझ्या जवळ आली
मला हलकीशी मिठी मारली अन मी खुश झालो…

तू बोल ना काहीतरी
@UgtWorld
ऐकव ना गोष्ट एखादी
कसलीही असो काहीही असो
चालेल ती, तू सुरुवात तर कर खरी
तू बोल ना काहीतरी..
शांत राहणं बोरिंग असतं
मूड ला चंचल ठेवणं मस्त वाटतं
तुला तर वेगळं सांगायला नको
तू ये ना जवळ कल्या आपण मस्ती
तू बोल ना काहीतरी ..
खूप छान आहेस ना तू
मग मन नको मोडू माझं
तुझं मन आहे तयार तर करू धमाल वेगळी
तू बोल ना काहीतरी..

खरे खोटे
फिरताना इकडे तिकडे नजर टाकतानाओठांवर बोल गाण्याचे
@UgtWorld
चेहयावर भाव शब्दांचे
मन शोधतोय मार्ग अर्थ भेटण्याचे..
काहीतरी नवीन सापडण्याचे
या शोधामागील करण्याचे
कारणाला आवर्जून विचारण्याच
हे आहे खरे की खोटेपणाचे..
नात्यात नाही खरे खोटे काही
जे आहे ते सरळ साफ आणि असंच राहील
कारण शब्द आणि विचार नकोच असतात
फक्त एक सोबत आणि भेट पुरेशी राहील…