तलब

एक चहाची तलब आणि
एक तिची सोबत
रोज असते जशी सकाळची गरज
तशी रात्र संपवण्यासाठी देतो तुझी ओळख..
सहज समजतील असं पण थोडं अवघड मन
खूप माया, प्रेम जसं त्यात आणि सोजवळ तन
चहाची उपमा जास्त लागू होते तिल
दोघांमध्ये फार कमी आहे फरक..
ही जशी आहे ना एक बाजू तिची
जशी श्वासाची हृदयाला सोबत
जरा सांभाळून घ्यावं लागतं मला
कारण तिला दुखावणं नाही परवडत…

@UgtWorld

सोबत का म्हणून, तू जवळ हवी

रोज ना भेट होते. फक्त हलकीशी बात होते
समजावता समजावता मनाची हालत होते
हि गोष्ट लवकर संपत यावी
सोबत का म्हणून. तू जवळ हवी..
आनंदाच्या एकूण एक क्षणात असते
क्षणांच्या उत्साहाला जोड देते
हा म्हणत सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते
ही एवढी छान संगत आहे आणि नेहमी हवी
सोबत का म्हणून. तू जवळ हवी…
फिरतीची ती वाट वेगळी
होते तिची तुझ्यापासून सुरुवात
सर्वकाही पाहिलं आहे तुझ्यासमवेत
नाही काही दुसरं त्यात आणि नको दुसर
सोबत का म्हणून, तू जवळ हवी…

@UgtWorld

एका उदास दुपारी

एका उदास दुपारी एक कॉफीचा तड़का द्यावा
एक घोंट पिऊनी त्याचा
नशेत क्षण तल्लीन व्हावा..
अशी ही गोड़ कडू जिभेवर येताच हळू
गरम गरम वाफावली नको
बर्फ टाकलेली थंड कॉफी पिऊ
सोबत कुणीतरी असावं एकट्याला आधार द्यायला
एक एक सिप पिताना एकमेकांना चिडवायला एका उदास दुपारी, एक कॉफी चा तडका द्यावा..
आता तिथेच बसुनी कितीतरी वेळ
ना समजत काही ना सुचत काही
एक घोंट पुन्हा घेऊन बोलणीला श्वास द्यावा
एका उदास दुपार
एक कॉफी चा तडका द्यावा…

@UgtWorld