एक भेट प्रतिरूपाची…
प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या होणाऱ्या भेटेची!
आपण प्रवास करत असताना कित्येक लोकांना भेटत असतो. त्या प्रवासाला फिरतीच रूप न देता ही एक प्रवास करता येतो. तो म्हणजे स्वतःच्या विचारांमधील प्रवास. या प्रवासात सगळे इतके मग्न झालेले असतात कि त्यांना भानच राहत नाही आपण ज्या ज्या माणसांना तिथे भेटतो त्यातल्या एका माणसात आपण स्वतःच्या प्रतिरूपाची भेट घेतो.
त्याचं वागणं, बोलणं, त्याच्या हालचाली पाहून दोन गोष्टी पुढे येतात एक आपला भूतकाळ आणि एक आपला भविष्यकाळ. दोन्ही गोष्टी आपल्या हातापलीकडच्या जेव्हा भासू लागतात तेव्हा मनात खंत तयार होते. जी पुढे जाऊन नैराश्याचं रूप घेते. अखेरीस आपल्या विचारांना एक वेगळं वळण देऊन आभासी गोष्टीची संकल्पना मनात रुजवते.
प्रत्येक जण स्वतःला त्याला हवं तस बनवण्यात मग्न असतो. काहींना याची संधी वारंवार मिळत असते. तर काहींना तिचा फायदा घेता येत नाही. आता प्रत्येकाची कारणं असतात म्हणा. काही लाचारी मुळे स्वतःला भेट देत नाही तर काही त्यांच्या आळशीपणा मुळे. आपलं प्रतिबिंब आपल्याला हवतसच घडवायला वेळ लागत नाही तर जिद्द लागते.