काही अंतरावरच तर आहोत आपण…

काही तास प्रवासाचे बस!

लघु-लेख


जेव्हा कधी आपल्याला कोणा आवडीच्या व्यक्तीला भेटता येत नाही. तेव्हा समजूत काढताना असं मनात येतं. अरे! काही अंतरावर तर आहोत, आपण कुठे लांब आहोत. तिथून सुरुवात होते आता तर भेटलंच पाहिजे. बराच वेळ झाला आहे भेटून. येतं ना बहुतेक वेळेला मनात आपल्या? मग ते नातं कोणतंही असुदे. अगदी कोणतही…

फारसा फरक पडत नाही काही नात्यांमध्ये. म्हणजे त्यात इतकी समजूत आणि घट्ट गाठ बांधलेली असते मैत्री आणि प्रेमाची की त्याला तोडच नाही. अशा नात्यांना गंज देखील लागत नाही. कारण समज आधीच घातलेली असते. वेळ तरी मिळत नसेल, जवळ तरी नसतील एकमेकांपासून किंवा काही तरी अडचणी असणार. पण एकदा का भेटलो की भान राहत नाही कसलंच. ना ती वेळ लक्षात येते ना आपण कुठे आहोत त्याच भान राहत.

अंतर खरतर कधीच मुद्दा नसतो नात्यात. अपूर्ण बोलणं किंवा मग भेटीचे राहिलेलं क्षण पूर्ण करण्याची लागून राहिलेली आस. ती कधी संपत च नाही आणि बहुदा कधी संपणार देखील नाही. त्यामुळे आपण अशा भेटी जास्त घेतो. त्यात प्रेम आणि भेटीचा आनंद अफाट असतो. क्षण तयार होताना अक्षरशः दिसू लागतात आपल्याला. नकळत का होईना हे क्षण आयुष्याला पुरून उरतात.

@UgtWorld

Related Posts