ठरवलेल्या गोष्टी कधीच पूर्ण होत नाहीत…

पण, ठरवलेल्या पेक्षा चांगलं मात्र नक्की होतं!

आपण काही गोष्टी खूप आधी पासून ठरवून बसलेलो असतो. त्या प्रमाणे सगळ्या गोष्टी करण्याच्या प्रयत्नात असतो. असं करायचं तसं करायचं अगदी सगळंच जुळवून घेतलेलं असतं. पण ठरवलेल्या गोष्टी हव्या त्या पद्धतीत कधीच पूर्ण होत नाहीत. परंतु त्या क्षणाला काही अश्या पद्धतीत गोष्टी घडतात ज्या आपल्याला अनपेक्षित असतात.

कधी कधी होतो आपण नाराज त्या वेळी. जेव्हा मनाप्रमाणे काही होत नसतं. पण पुढचे येणारे क्षण या उदासी ला दूर करण्यासाठी काळजी मात्र नक्की घेत असतात. ते अशा प्रकारे क्षणाची आखणी करतात काही जणांना घेऊन. कि आपण ते क्षण जगताना आनंदी होतो. पुढे जाऊन आठवू लागतो कि ठरवलं तसं तर झालं नाही पण झालं ते त्याहून काही कमी नव्हतं.

किती तरी वेळा सगळेच ह्या क्षणांतून, या अशा वेळेतून गेलेले असतात. रीतसर प्लॅन करून सुद्धा बरीच मंडळी फसतात. तर आपण नाराज होऊन काय अर्थ नाही. आपण त्यापेक्षा काहीतरी अजून छान करू. वेळ आहे तर हवं ते करून घ्या! एकदा वेळ सरली कि पुन्हा मागे ती वेळ आणणं कठीण असतं. मजा करा आणि दुःखद क्षणांना जमेल तसं बाजूला सारा.

@UgtWorld

Related Posts